sonu sood  
मनोरंजन

अभिनेता सोनू सूदमुळे 'तो' तरुण १२ वर्षांनंतर राहणार स्वतःच्या पायावर उभा

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता सोनू सूद गेल्या सात-आठ महिन्यांपासून जेव्हापासून लॉकडाऊन सुरु झालं तेव्हापासून आत्तापर्यंत सतत चर्चेत आहे. आणि या चर्चेचं कारण म्हणजे माणुसकी. एखाद्याच्या दुःखी आयुष्यात त्याची मदत करुन त्याच्या चेह-यावर हसू आणणा-या सोनू सूदला यावेळी साथ मिळाली ती करनाल येथील विर्क हॉस्पिटलच्या तरुण न्यरो सर्जन डॉक्टर अश्विनी यांची. सोनू सूदमुळे गेल्या १२ वर्षांपासून आयुष्यासोबत लढणा-या छत्तीसगढच्या अमनला नवीन आयुष्य मिळालं आहे.

अमन गेल्या १२ वर्षांपासून पाठिच्या कणाच्या गंभीर आजारामुळे बिछान्याला खिळून होते. अमनचे वडिल भाड्याच्या घरात राहतात आणि रिक्षा चालवतात. पैशांच्या कमतरतेमुळे आणि महागड्या उपचारामुळे आपल्या तरुण मुलाला अशा परिस्थितीत पाहण्यावाचून या दोघांकडे दुसरा कोणताच उपाय नव्हता. मात्र बिछान्याला खिळून असलेल्या अमनने एक प्रयत्न केला ज्यामुळे अमन आता लवकरंच स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. अमनचे आई-वडिल सोनू सूद आणि डॉक्टर अश्विनीची स्तुती करताना थांबत नाहीत. कारण या दोघांमुळेच अमनशी संबधित असलेली त्यांची सगळी स्वप्न आत सत्यात उतरणार आहेत. 

अमनवर सोनू सूदच्या माध्यमातून करनालमधील विर्क हॉस्पिटलमधील न्युरो सर्जन डॉक्टर अश्विनी यांच्या देखरेखीखाली उपचार झाले.अमनच्या पाठीच्या कण्याची सर्जरी झाली जी कित्येक तास सुरु होती. मात्र आता अमनचं हास्यचं त्याचं भविष्य सांगतंय. अमनला नवीन आयुष्य देणा-या डॉक्टर अश्विनी यांनी आत्तपर्यंत जवळपास १ हजार डोकं आणि पाठिच्या कण्याच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. ते स्वतःला नशीबवान समजतायेत की सोनू सूदमुळे त्यांना अशा लोकांची मदत करायला मिळाली ज्यांना त्याची खरंच गरज होती.       

actor sonu sood helps handicapped person aman  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Suraksha Bill : मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात मांडलं 'जनसुरक्षा' विधेयक ; जाणून घ्या, यावेळी काय म्हणाले?

Thane News: घोडबंदर रस्ता होणार पालिकेचा, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?

Crime: ७ ते १२ वयोगटातील मुलांनी टोळी बनवली; चविष्ट जेवण खाण्यासाठी नको ते कृत्य, चौकशीत पोलिसही अवाक्, नागपुरात काय घडलं?

IND vs ENG 3rd Test: W,1,0,W! नितीश कुमार रेड्डीने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना पाठवले माघारी, Video

Crime News : 'छोटी भाभी' प्रकरणातील बडतर्फ हवालदार युवराज पाटील अखेर अटकेत

SCROLL FOR NEXT