tejaswini pandit's navaratrri look on third day
tejaswini pandit's navaratrri look on third day  
मनोरंजन

तेजस्वीनीने 'जरीमरी आई' च्या रुपात दिला जलसंर्वधनाचा संदेश

वृत्तसंस्था

मुंबई : नवरात्रोत्सवाला उत्साह आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. नवरात्रातील नऊ देवींची रुप आणि त्यांचे महत्तव सांगण्याचा प्रयत्न अभिनेत्री तेजस्वीनीने पंडितने केला आहे. हे फोटो ती रोज फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करते आहे. त्याशिवाय देवीच्या रुपाला अनुसरुन ती कॅप्शनमधून संदेशही देत आहे. सलग तिसऱ्या दिवशी तेजस्वीनीने 'जरीमरी आई' च्या रुपातला फोटो शेअर केला.

विशेष म्हणजे देवींचे रुप धारण करुन ती समाजातल्या महत्तवपूर्ण समस्यांवर भाष्य करत,  समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. नुकत्याच अपलोड केलेल्या पोस्टमध्ये तिने 'जरीमरी आई' च्या रुपातला फोटो शेअर केला असून या फोटोमधील महत्तावाचा भाग म्हणजे सध्याची समुद्राच्या प्रदुषणाचा मुद्दा घेऊन तीने आजचं भीषण वास्तव समोर आणलं आहे. हा फोटो, संकल्पना आणि त्यासाठी दिलेलं कॅप्शन एकुणच प्रभावी संदेश देत आहेत. 

यामध्ये फोटोमध्ये ती समुद्रातील दगडावर बसलेली आहे. तिच्या मागे पाचमुखी तोंडाचा नाग आहे. फोटोला फॅप्शन देताना तिने लिहिलं, "माझ्या तळाशी असलेलं सारं काही तुला पाहता येतं ते बळजबरीने ओरबाडून ही घेता येतं, पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही. कधी काळी मोती शंख शिंपल्यांनी उजळून जायचा माझा आसमंत .पण आता माझे अलंकार झालेत प्लास्टिक च्या पिशव्या , अर्धवट विरघळलेलया मूर्त्या, दारूच्या बाटल्या आणि घुसमटून मेलेले माझ्याच उदरातले जलचर. पहिल्यांदा माझ्या लाटांवर स्वार झाला होतास तेव्हा वाटलं नव्हतं माझी अशी फसवणूक करशील म्हणून... असं म्हणतात पेरिले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते आता तुझ्या या वागण्याचं कसं प्रत्युत्तर देऊ मी...माझ्या लाटांनी तुझं जीवन कसं समृद्ध करू मी ?". समुद्रातील प्रदुषणावर तिने सवाल केला आहे.

तिच्या या अनोख्या कल्पनेला सर्वच स्थारांवर कौतुक केलं जात आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकला चाहत्यांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षीदेखील तिने नवरात्रात नऊ देवींची रुप साकारली होती. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी तिने कामाख्या देवीचं रुप धारण करत स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी संदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT