Tiger Shroff girlfriend disha patani's video viral on social media esakal
मनोरंजन

Heropanti 2: चित्रपट सोडून टायगर-दिशाच्या लग्नाचीच चर्चा

उत्साह बाजूला सोडला तर आणखी एक चर्चा चित्रपटाएवढीच टायगरच्या गर्लफ्रेंडविषयी सोशल मीडियावर सुरू आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

अॅक्शन शॉटने तरूण आणि तरूणींच्या मनात खास आवड निर्माण करणारा टायगर श्रॉफ त्याच्या धमाकेदार एन्ट्रीसह आज येतोय प्रेक्षकांच्या भेटीला.खरं तर त्याने कालच हिरोपंती २ चा ट्रेलर टाकत प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर पाडली आहे.टायगरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला त्याने हा व्हिडिओ टाकला आहे.त्याच्या या व्हिडिओला सहा लाखाच्या घरात लाईक्स मिळाले आहेत.यावरून प्रेक्षकांच्या उत्साहाचा अंदाज तुम्हाला लावता येईल.मात्र हा उत्साह बाजूला सोडला तर आणखी एक चर्चा चित्रपटाएवढीच टायगरच्या गर्लफ्रेंडविषयी सोशल मीडियावर सुरू आहे.

'इस ईद हिरोपंती तो बनती है' असे कॅप्शन देत टायरने त्याच्या इन्स्टाग्रामला 'हिरोपंती २' चा व्हिडिओ पोस्ट केलाय.टायगरला जरी या व्हिडिओसाठी सहा लाखाच्या घरात लाईक्स मिळाले तरी या चित्रपटापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडची चर्चा जास्त चर्चेत दिसतेय.'हिरोपंती २' च्या स्क्रिनींगच्या वेळी दिशाने हजेरी लावली होती.त्यावेळी पॅपराजीला पोज देतानाचा तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय.तीच्या या व्हिडिओवरून तीला सोशल मीडियावर ट्रोल देखिल केल्या जात आहे.दिशा लीप्स सर्जरी करून आली आहे,हीच्या बॅगमधे काय असेल असे कमेंट करत तीची खिल्ली उडवलेली दिसते.

पॅपराजीला अश्या पोजेस देत असतानाच्या एका व्हिडिओवरून दिशाला सोशल मीडियावर ट्रोल केल्या जात आहे.

२०१४ च्या बॉलीवूड डेब्यू एन्ट्रीने टायगरचे बॉलीवूडमधे पदार्पण झाले होते.हिरो पंती नंतर आता 'हिरोपंती २' साठी प्रेक्षकांच्या उत्साहाला हा चित्रपट किती खरा ठरतो आहे याचा अंदाज आजच कळेल.टायगर श्रॉफसोबत या चित्रपटात तारा सुतारीया दिसणार आहे.'हिरोपंती २' च्या शूटिंगची सुरूवात मागल्या वर्षी ३ एप्रिलपासून मुंबईमधे सुरू झाली होती.'बागी २' आणि 'बागी ३' नंतर डायरेक्टर व कोरियोग्राफर अहमद सोबत टायगरचा हा तीसरा चित्रपट असणार आहे.या चित्रपटासाठी अॅकॅडमी पुरस्कार विजेता ए आर रेहमान,गीतकार महबूब आणि अहमद खान यांची टीम यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र जमलेली होती.हा चित्रपट आज अॅमेझॉन प्राईमवर आज बघायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT