मनोरंजन

विद्युत जामवालचा 'सनक' डॅशिंग लूक व्हायरल!

'सनक - होप अंडर सीज' भारतातील सर्वात मोठ्या प्रीमियम ओटीटी मंचावर प्रदर्शित होणार आहे.

युगंधर ताजणे

विपुल अमृतलाल शाह आणि झी स्टूडियोजचा बहुप्रतीक्षित चित्रपट, 'सनक - होप अंडर सीज' भारतातील सर्वात मोठ्या प्रीमियम ओटीटी मंचावर प्रदर्शित होणार आहे. कनिष्क वर्माद्वारे दिग्दर्शित, विद्युत जामवाल आणि बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनित हा चित्रपट लवकरच डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर प्रदर्शित होणार आहे. या घोषणेसोबतच, निर्मात्यांनी एक नवे आकर्षक पोस्टर व्हायरल केलं आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. ज्यामध्ये विद्युत हातामध्ये बंदूक घेऊन मिशनसाठी सज्ज झालाय. विपुल शाह यांनी, सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडसोबत अनेक उत्तम सिनेमांसोबत दर्शकांचे मनोरंजन केले आहे.

विपुल शाह यांनी, सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडसोबत अनेक उत्तम सिनेमांसोबत दर्शकांचे मनोरंजन केले आहे. या वेळी झी स्टूडियोजच्या सहयोगाने, त्यांचे प्रोडक्शन 'सनक - होप अंडर सीज' या धमाकेदार एक्शनपटासोबत सज्ज झाले आहेत. विद्युत चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून आपल्या करिअरमध्ये यशस्वी निर्माता विपुल शाह यांच्यासोबत हा 5वा चित्रपट आहे. काही महिन्यांआधी आलेल्या 'सनक' च्या आकर्षक पोस्टरने दर्शकांची मनं जिंकली होती. आणि त्च्याच्या या नव्या पोस्टरने प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. .

विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, 'सनक - होप अंडर सीज' झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत आहे. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT