actor Vijay Antony daughter Meera dies by suicide at the age of 16  SAKAL
मनोरंजन

Vijay Antony Daughter: अभिनेता - गायक विजय अँटोनीच्या मुलीने जीवन संपवलं

अभिनेता - गायक विजय अँटोनीच्या कुटुंब शोकसागरात बुडून गेलं आहे

Devendra Jadhav

Vijay Antony Daughter Suicide News: संगीतकार, अभिनेता आणि निर्माते विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने 19 सप्टेंबरच्या पहाटे आत्महत्या केली. ती 16 वर्षांची होती.

रिपोर्ट्सनुसार, मीराला तिच्या चेन्नईच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रिपोर्ट्सनुसार, ती दबावाखाली होती आणि त्यासाठी उपचार घेत होती.

विजय अँटोनीच्या मुलीने आयुष्य संपवल्याने एकच खळबळ

विजय अँटनी हा लोकप्रिय गायक अन् अभिनेता. 19 सप्टेंबर रोजी, विजय अँटनी आणि त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला होता.

विजयची मुलगी मुलगी मीरा हिचा मृतदेह चेन्नईतील अलवरपेट येथील त्यांच्या निवासस्थानी पहाटे 3 वाजता आढळून आला होता. ती अवघ्या 16 वर्षांची होती आणि चेन्नईतील एका लोकप्रिय शाळेत शिकत होती. अपुष्ट वृत्तानुसार मुलगी नैराश्याशी झुंज देत होती.

पोलिस करणार सखोल चौकशी

मीराचा मृतदेह बघताच घरातील नोकरांच्या साहाय्याने मीराला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी तिला मृत घोषिक केले. मीराने स्वतःचं जीवन संपवल्याने पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.

विजय आणि त्याच्या कुटुंबाला हा मोठा धक्का बसला असेल यात शंका नाही. अवघ्या १६ वर्षांच्या मुलीने स्वतःचं आयुष्य संपवल्याने विजय आणि त्याच्या परिवाराला असंख्य चाहते धीर देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT