vijay
vijay 
मनोरंजन

'हा' अभिनेता पोलिसांच कौतुक करायला आला पुढे, पण मास्क न घालताच..कलाकारांसाठी वेगळे कायदे आहेत का? म्हणत नेटक-यांनी केलं ट्रोल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई-  कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग पाहता त्याचा सामना करण्यासाठी नामवंत चेहरे समोर येत आहेत. एकूणच सरकारला मदत करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि सध्याची स्थीती लक्षात घेता बॉलिवूड कलाकारांबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसष्टीतील कलाकार देखील वेगवेगळ्या पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत लोकांना घरात राहण्याचं, स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करताना दिसतात. याशिवाय सतत हात धुणे आणि काही कारणास्तव बाहेर निघालात तर मास्क घालूनच बाहेर पडा असेही आवाहन कलाकार करताना दिसत आहेत. याशिवाय सरकारने जे कोणी मास्क न घालता घराबाहेर पडतील त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यातच आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडाला मास्क न घातल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. 

अभिनेता विजय देवरकोंडा हैदराबाद पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पोहोचला होता. यावेळी त्याने मास्क न घातल्याने त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. हैदराबाद सिटी पोलिस यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विजयचे काही पोलिस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे संवाद साधतानाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये विजयने दिवसरात्र देशाची सेवा करणाऱ्या पोलिसांचे आभार मानले आहेत. या फोटोमध्ये विजय मास्कशिवाय सीपी अंजनी कुमार यांच्या बाजूला बसलेला दिसला. आणि त्याने या फोटोमध्ये मास्क घातलेला दिसला नाही म्हणून अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलेलं आहे.

यावर एक नेटकरी पोलिसांना सांगताना म्हणाला की, 'या व्यक्तीलाही कायदा लागू होऊ शकतो का? पोलिसांसमोर मास्क न घालता विजय बसलेला आहे. विजय देवरकोंडा कोणी डॉक्टर किवा कोणत्याही मेडिकल फील्डमध्ये आहे का? सर तुम्हीही कलाकरांपासून लांब राहा. सध्याच्या स्थितीला खरे हिरो पोलिस आणि डॉक्टर्स आहेत.'

याशिवाय 'हे विचारण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण हे विचारणं माझा हक्क आहे की कलाकारांनी मास्क नाही घातला तर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि एखाद्या सामान्य व्यक्तीने मास्क नाही घातला तर त्यांच्यावर लगेचच कारवाई करण्यात येते. मला याच उत्तर मिळेल का?',

तर एकीने, ' मला मास्क दिसत नाही आहे. कलाकारांसाठी वेगळे कायदे आहेत का?' असं विचारलंय..

याशिवाय 'दिवसरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असलेल्या पोलिसांना विजय देवरकोंडा तिकडे जाऊन अशी काय महत्वाची सूचना देणार आहेत. अशा रील हिरोला आणून रिअल हिरोंचा अपमान का करता?'  असंही एका नेटक-याने म्हटलं आहे.

असे एक ना अनेक ट्विट करत अभिनेता विजयला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

actor vijay devarakonda gets slammed for not wearing a mask

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT