Virutchagakanth 
मनोरंजन

अभिनेत्याचा रिक्षात मृतदेह; अखेरच्या श्वासापर्यंत कामासाठी केला संघर्ष

स्वाती वेमूल

तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता विरुतचगाकांत बाबूचा (Virutchagakanth Babu) अकस्मात मृत्यू झाला. 'काधल' या तामिळ चित्रपटात भूमिका साकारलेल्या या अभिनेत्याचा मृत्यू चेन्नईतील एका ऑटोरिक्षामध्ये झाला. झोपेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी विरुतचगाकांत यांच्या आईवडिलांचं निधन झालं. तेव्हापासून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. चित्रपटसृष्टीतही फारसं काम मिळत नसल्याने त्याची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. अनेकदा त्याला ऑटोरिक्षामध्ये किंवा मंदिरात झोपताना पाहिलं गेलंय. आईवडिलांच्या मृत्यूनंतर तो मानसिकदृष्ट्या फार खचला होता असं म्हटलं जातंय. 

२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारत आणि संध्या यांच्या 'काधल' चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने नवोदित अभिनेत्याची भूमिका साकारली होती आणि त्यातील संवादामुळे तो फार चर्चेत आला होता. विरुतचगाकांतच्या अकस्मात निधनामुळे तामिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

'काधल' या चित्रपटानंतर त्याला फारसे कोणते ऑफर्स मिळाले नाहीत. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती खालावली होती. काही वर्षांपूर्वी चेन्नईतल्या एका मंदिरात स्टंट दिग्दर्शक साई धीना यांनी त्याला पाहिलं होतं. त्याला ओळखताच साई यांनी त्याला स्वत:च्या घरी नेलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. विरुतचगाकांतला कामाची संधी देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी इतर दिग्दर्शकांना केली होती. मात्र अखेरच्या श्वासापर्यंत ते कामासाठी संघर्ष करतच राहिले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT