Actor Vivek Oberoi defraud of Rs 1.54 crore files complaint after business partners defraud him SAKAL
मनोरंजन

Vivek Oberoi: विवेक ओबेरॉय आणि बायकोची तब्बल दीड कोटींची फसवणुक, खटला दाखल, वाचा प्रकरण

विवेकने आरोपांच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Devendra Jadhav

Vivek Oberoi Defraud 1.54 Crore News: अभिनेता विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांका यांची फसवणुक झालीय. विवेकच्या किमान तीन व्यावसायिक भागीदारांविरुद्ध ₹1.55 कोटींची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्या वतीने फसवणुकीचा खटला दाखल केला आहे.

ओबेरॉयने आरोप केला आहे की, आरोपींनी अभिनेत्याला एका कार्यक्रमात पैसे गुंतवायला लावले आणि आकर्षक नफ्याचे आश्वासन दिले.

मात्र, नंतर आरोपींनी या रकमेचा गैरफायदा घेत स्वतःच्या स्वार्थासाठी हे पैसे वापरले. या आरोपांच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

(Actor Vivek Oberoi defraud of Rs 1.54 crore files complaint after business partners defraud him)

साथीदारांनी फसवलं

विवेक ओबोरॉयने दाखल केलेल्या फसवणुक खटल्यात आरोपींमध्ये चित्रपट निर्माते आणि कार्यक्रमाचे आयोजक संजय साहा, त्याची आई नंदिता साहा आणि राधिका नंदा यांचा समावेश आहे.

अभिनेते आणि त्याच्या पत्नीच्या वतीने त्यांचे अकाउंटंट देवेन बाफना यांनी तक्रार दाखल केली होती.

त्यांनी पोलिसांना सांगितले की आरोपी आणि विवेक यांनी चित्रपट व्यवसाय तसेच चित्रपट निर्मितीशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात तज्ञ असलेली इव्हेंट कंपनी सुरू करायची होती.

करार केला तरीही फसवलं

“ओबेरॉयने 2017 मध्ये ओबेरॉय ऑरगॅनिक्स नावाची कंपनी सुरू केली होती. ही कंपनी फार चांगले काम करत नसल्यामुळे, विवेकने प्रथम तीन आरोपींना फर्ममध्ये भागीदार म्हणून आणण्याचा निर्णय घेतला.

नंतर आधीचा व्यवसाय विसर्जित करून त्याच नावाने इव्हेंट व्यवसायात रूपांतर केले. हा करार दोन्ही पक्षांमध्ये जुलै 2020 मध्ये झाला होता."

स्वतःच्या स्वार्थासाठी केला वापर

काही महिन्यांनी ओबेरॉयने त्याचे शेअर्स ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट या त्याच्या मालकीच्या दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.

“ओबेरॉय यांना एप्रिल 2022 मध्ये एका कर्मचार्‍याद्वारे उपक्रमातील निधीच्या गैरव्यवहाराबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ही समस्या सोडवण्यासाठी बाफनाच्या सेवा घेण्यात आल्या.

त्यानंतर त्याला कळले की संजय साहाने त्याच्या आईसाठी जीवन विमा प्रीमियम भरण्यास याशिवाय विविध वैयक्तिक कारणांसाठी कंपनीचे पैसे वापरले आहेत.

आरोपींवर गुन्हा दाखल

नंदा यांनीही कंपनीतून पैसे काढले होते, असे एमआयडीसी पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले. खाते विवरणानुसार दोन भागीदारांकडून ₹58 लाखांहून अधिक रक्कम लुटण्यात आली होती,

असेही ते म्हणाले. जेव्हा विवेक ओबेरॉयच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने आपल्या भागीदारांविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची सुद्धा आरोपींनी ₹51 लाखांची फसवणूक केलीय. या दुसर्‍या फसवणुकीबद्दलही स्पष्टीकरण देण्यास सांगीतले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही आरोपींवर आयपीसीच्या कलम ४०६ (गुन्हेगारी भंग), ४०९ (अप्रामाणिक गैरव्यवहार) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT