Actors union will join writers on strike, shutting down Hollywood  SAKAL
मनोरंजन

Hollywood Strike: पहिल्यांदात असं घडतंय.. हॉलीवुडमध्ये अभिनेते - लेखक संपावर, हे आहे मोठं कारण

हॉलीवुडमध्ये लेखक - अभिनेत्यांनी आंदोलनाचा बडगा पुकारलाय. काय झालंय नेमकं, आम्ही तुम्हाला सांगतो..

Devendra Jadhav

Hollywood Actors- Writers Strike News: तसं हॉलीवुड शांत असतं. आपण भलं आणि आपण काम भलं अशा पद्धतीने हॉलीवुडचं काम सुरु असतं. हॉलीवुडचे सिनेमे कोणत्याही वादात अडकत नाहीत. शांतीत क्रांती करुन जातात.

अशातच सध्या हॉलीवूड मध्ये मात्र आंदोलन पेटलंय. हॉलीवुडमध्ये लेखक - अभिनेत्यांनी आंदोलनाचा बडगा पुकारलाय. काय झालंय नेमकं, आम्ही तुम्हाला सांगतो..

(Actors union will join writers on strike, shutting down Hollywood )

हॉलिवूड कलाकारांनी गुरुवारी संपावर जाण्याची घोषणा केली. या संपात अभिनेते आणि लेखक सहभागी झाले आहेत. शेवटची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर 63 वर्षांतील हॉलीवुडमधील हे पहिले उद्योगव्यापी शटडाउन आहे.

यामध्ये जवळपास सर्व चित्रपट आणि टीव्ही प्रॉडक्शन ठप्प होणार आहे. हा संप का होत आहे, जाणून घ्या त्याबाबतची संपूर्ण माहिती.

स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड (SAG- AFTRA) ए-लिस्ट स्टार्ससह 160,000 कलाकारांचे प्रतिनिधित्व करते. ते म्हणतात की त्यांच्या, मागणीनुसार वाटाघाटी कोणत्याही कराराशिवाय संपल्या आहेत.

कमी पगार आणि AI संबंधित धोका, पगार बंद होणे अशा अनेक कारणांमुळे लेखकांनी संप पुकारलाय. आता या संपात SAG- AFTRA सुद्धा सहभागी झालेय.

AI प्रवाहाचा उदय आणि कोरोनाव्हायरसमुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे स्टुडिओवर दबाव आला आहे, ज्यापैकी अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच अभिनेते आणि लेखक देखील वेगाने बदलत्या वातावरणात चांगले पगार आणि सुरक्षितता शोधत आहेत.

थोडक्यात सांगायचे झाले तर... वॉल्ट डिस्ने कंपनी आणि नेटफ्लिक्स स्टुडिओचे प्रतिनिधित्व करणार्‍या अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्सबरोबर कामगार युनियनचे नवीन लेबर अॅग्रीमेंट होऊ शकले नाही. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासुनच लेखक - अभिनेते संपावर गेले आहेत.

सांगायचं झालं तर.. हॉलीवुडचे लेखक 11 आठवड्यांपासून संपावर आहेत. दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये AI चा भविष्यातील वापराविरूद्ध चांगला पगार आणि संरक्षण मिळण्याच्या त्यांच्या सामान्य मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी संप सुरू केला. आता हा संप मिटतो की चिघळतो, हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणे पडले महागात; पुणे पोलिसांनी काढली धिंड

...आणि नीरजसाठी लिहिलेली चिठ्ठी बाबांनी वाचली; मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधीचा मजेदार किस्सा

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर 'हे' स्वस्त उपाय केल्यास होईल धनप्राप्ती अन् माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Jalgaon News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांचा आक्रमक हल्ला

Natural sleep remedies : तुमच्या डोक्यात रात्री खूप विचार येतात का? ताण कमी करून शांत झोप येण्यासाठी 'हा' घरगुती उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT