Abhilasha Patil 
मनोरंजन

'छिछोरे'मधील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा

स्वाती वेमूल

मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटील Abhilasha Patil यांचे कोरोनामुळे निधन झाले. अभिलाषा यांनी दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर अनेक भूमिका गाजवल्या आहेत. 'बायको देता का बायको', 'प्रवास' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. तर सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूरच्या 'छिछोरे' chhichhore या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. चित्रपटांसोबतच त्यांनी मालिकांमध्येही काम केलं. 'बापमाणूस' या मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. (actress abhilasha patil passes away due to covid 19)

अभिलाषा या वाराणसीमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत होत्या. शूटिंगनंतर जेव्हा त्या मुंबईत परतल्या, तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लक्षणे दिसताच त्यांनी चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अभिलाषा आधी घरीच क्वारंटाइनमध्ये होत्या. मात्र तब्येत बिघडताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिलाषा यांच्या निधनाने मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा : गोव्यात 'सूर नवा ध्यास नवा'चं शूटिंग पाडलं बंद; सेटवर आमदारांचा गोंधळ

अभिलाषा यांनी 'छिछोरे' या हिंदी चित्रपटासोबतच वरुण धवन आणि आलिया भट्टच्या 'बद्रिनाथ की दुल्हनियाँ', अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज' आणि 'मलाल' यांमध्येही काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT