Ada Sharma Google
मनोरंजन

मुंबईत कचऱ्याचं भाग्य उजळलं;चक्क बॉलीवूड अभिनेत्री बनली सफाई कामगार

अभिनेत्री अदा शर्माची व्हिडीओ रील सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

सोशल मीडिया(Social Media) हे माध्यम आता छंद न होता व्यसन बनत चाललं आहे हे काही चुकीचं नाही. अनेक जण दररोज सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज,व्हिडीओज पोस्ट करीत असतात. बरं विशेष म्हणजे यासाठी ते थीम वगैरे आखून मोठ्या मेहनतीनं आपली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड करीत असतात. आता प्रत्येक जणाच्या बाबतीत आपण बोलू शकत नाही की ते त्यांच्या व्यावसायिक कामासाठी,प्रमोशनसाठी ते सारं करतात. काही जणं अगदी हौसेपोटी,लोकांचं मनोरंजन आपल्याकडून व्हावं यासाठी देखील अतरंगी गोष्टी करताना दिसतात. यात फक्त सर्वसामान्यच हे करत असतील तर नाही. त्यात आपले बॉलीवूड स्टार्सही अग्रकमी आहेत बरं का. असाच एक फनी व्हिडीओ एका बॉलीवूड(Bollywood) अभिनेत्रीनं सोशल मीडियावर 'व्हॅलेंटाईन डे'(Valentine Day) च्या निमित्तानं पोस्ट केला,जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. काय केलं आहे तिनं?

मुंबईतला कचरा गोळा करणारी ही ब़ॉलीवूड अभिनेत्री आहे अदा शर्मा(Ada Sharma). जी सध्या बॉलीवूडमध्ये सक्रिय नसली तरी तिच्या नावावर २००८ साली आलेला '१९२०','हंसी तो फसी','कमांडो' सारखे हीट सिनेमे जमा आहेत. मात्र अदा नेहमीच सोशल मीडियावर फनी व्हिडीओ शेअर करीत असते. असाच एक व्हिडीओ काल तिनं पोस्ट केलाय जो सध्या चर्चेत आहे. तिनं 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी आपल्या बॉयफ्रेंडला कचरा संबोधत हा व्हिडीओ पोस्ट केलाय. यात ती मुंबईच्या रस्त्यावर कचऱ्याच्या मोठमोठ्या बॅग्ज हातात घेऊन डस्टबिनमध्ये टाकताना दिसत आहे. तसंच तिनं डस्टबिनसोबतच नाही तर या कचऱ्याच्या बॅग्जसोबत रॅम्प वॉक करण्याचा आनंदही लुटला आहे. तिच्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला समर्पक असं गाणंही वाजत आहे. तुम्हाला पटत नाहीय तर खात्रीसाठी अभिनेत्रीनं स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला व्हि़डीओ आम्ही बातमीत जोडलेला आहे. एकदा पाहूनच घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT