phulala sugandh maticha : स्टार प्रवाह (star pravah) वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कीर्ती आणि शुभम यांची जोडी चाहत्यांना बरीच भावली आहे. शिक्षण अर्ध्यातून टाकून लग्नगाठ बांधलेल्या किर्तीचा प्रवास आता 'आयपीएस' बनण्यापर्यंत झालेला आहे. पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून तिची काही सुटका होत नाहीय, कारण तिच्या सासूबाई म्हणजे जीजी अक्का गृह कर्तव्याच्या बाबतीत प-प्रचंड आग्रही आहेत. मालिकेत जरी जीजी अक्काचा करारी बाणा दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र त्या अत्यंत प्रेमळ आहेत, त्यांनी एक सामाजिक उपक्रम आपल्या सेटवर राबवला आहे.
(actress aditi deshpande collect plastic bottles on phulala sugandh maticha set for social cause)
निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय. त्याचं हे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपण सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे, याच भावनेतून स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कलाकारांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलाय. जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर करण्यात येत आहे. सेटवर पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र जमा केल्या जातात.
अदिती ताई या रिकाम्या बाटल्या दादर मधली ग्रीन इनिशिएटीव्ह या संस्थेला देतात. या संस्थेमार्फत प्लास्टिकच्या या निरुपयोगी बाटल्यांपासून इंधन निर्मिती केली जाते किंवा बागेत सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात. गेले वर्षभर अदितीताई हा उपक्रम सेटवर राबवत आहेत. अदिती ताईंच्या या उपक्रमाला फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील सर्वच कलाकार सहाय्य करत असून पर्यावरण रक्षणासाठी झटत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवरचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.