alka kubal , alka kubal daughter, alka kubal movies SAKAL
मनोरंजन

Alka Kubal : अलका कुबलच्या पोरी कमाल! थोरली मुलगी पायलट तर धाकटी झालीय आत्ता...

अलका कुबल यांच्या आयुष्यात नुकतीच एक आनंदाची गोष्ट घडली आहे

Devendra Jadhav

Alka Kubal News: अलका कुबल मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री. अलका कुबल यांचे जुने नवे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. अलका कुबल या व्यावसायीक दृष्ट्या यशस्वी अभिनेत्री आहे. पण व्ययक्तीक आयुष्यात सुद्धा अलका कुबल यांचं आयुष्य सुख समाधानाचं आहे. अलका कुबल यांच्या आयुष्यात नुकतीच एक आनंदाची गोष्ट घडली आहे

अलका कुणाल यांची थोरली मुलगी ईशानी पायलट आहे हे सर्वांना माहीतच आहे. आता अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीने सुद्धा करियरमध्ये यशस्वी भरारी मारली आहे. अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी आता डॉक्टर झाली आहे. अलका ताईंनी कस्तुरीचा खास फोटो सोशल मीडियावर शेयर करत हि आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

कस्तुरीचा पदवीदान समारंभातील खास फोटो अलका ताईंनी शेयर केलाय. अलका कुबल या फोटोला कॅप्शन लिहितात, "कस्तुरी ने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली.आज पासून डॉ. कस्तुरी आठल्ये म्हणून ती ओळखली जाईल.आम्हाला तुझा अभिमान आहे. खूप शुभेच्छा" अशी पोस्ट अलका ताईंनी केली आहे. FMGE (Foreign Medical Graduate Examination) हि मेडिकल एंट्रन्स टेस्ट असते. हि टेस्ट पास झाल्यावर संबंधित व्यक्ती डॉक्टरकिची प्रॅक्टिस करू शकते

गेल्या वर्षी २०२२ ला अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानी हिचा विवाहसोहळा पार पडला. अलका यांनी सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे खास फोटो पोस्ट केले होते. ईशानीने दिल्लीच्या निशांत वालिया यांच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

ईशानी ही पायलट आहे. तिला 2015 साली पायलटचं 'लाइफटाइम लायसन्स' मिळालं आहे. आता अलका ताईंची धाकटी मुलगी कस्तुरी सुद्धा डॉक्टर झाल्याने आई म्हणून अलका ताईंना दोन्ही मुलींचा प्रचंड अभिमान वाटत असणार यात शंका नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT