Ananya pandey trolled 
मनोरंजन

'तुझ्या शरिरात महिलांसारखे काहीच नाही'; नेटकऱ्यांनी केले होते अनन्याला ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे हिला अनेक वेळा नेपोटिझमवरून ट्रोल केले जाते. 'स्टुडंट ऑफ द इयर - 2' या चित्रपटामधून अनन्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 'पती-पत्नी और वो' चित्रपटामधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अनन्या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

अनन्याला तिच्या वजनामुळे अनेक नेटकरी ट्रोल करत असतात. याबाबत अनन्याने एका मुलाखतीत सांगितले की,'एकदा माझा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मी माझ्या आई वडिलांसोबत होते. तेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करत नव्हते. त्यावेळी मला कोणी तरी कमेंट केली की, मी मुलांसारखी दिसते. हे ऐकून मला फार वाईट वाटले. कारण ती माझ्या आयुष्यामधील सर्वात महत्वाची फेज होती. त्या फेजमध्येच तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवायला सुरूवात करता. तसेच याच फेजमध्ये तुम्ही स्वत:वर प्रेम करयाला शिकता. पण लोकांच्या या बोलण्यावरून स्वत:वरचा विश्वासच नाहीसा होतो.'    

अनन्याने हेसुद्धा सांगितले की, अनेक वेळा लोक तिच्या शरिरावरून तिला कमेंट करतात. 'तुझ्या शरिरात महिलांसारखे काहीच नाही', 'फ्लॅटस्‍क्रीन' अशा कमेंट करून तिला ट्रोल केले जाते. पण या ट्रोलर्सकडे लक्ष न देता अनन्या तिचे फोटो सोशल मीडियावर बिनधास्तपणे टाकत असते. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडेची मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT