Kiran Mane  
मनोरंजन

'अभिनेत्री म्हणून मी किरण मानेंच्या बाजूने', अनिता दातेंची पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया अनिता दाते यांनी दिली आहे.

मुंबई - स्टार प्रवाह (Star Pravah) या वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulagi Zali Ho) या मालिकेत विलासची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना राजकीय भूमिका घेतल्यानं मालिकेतून काढून टाकण्यात आलं. यानंतर सोशल मीडियासह काही कलाकार आणि नेते मंडळींनी वाहिनीचा निषेध नोंदवला आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून असल्याचं किरण माने यांनी म्हटलं होतं. आता अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) यांनी किरण माने यांची बाजू घेतली असून त्यांना पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अनिता दाते यांनी म्हटलं की, 'एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांच्या बाजूने आहे. कोणत्याही अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे आहे . अश्या निर्मिती संस्था आणि चॅनल ह्यांनी त्या कलाकाराला कामा वरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अश्या व्यवस्थांचा मी निषेध करते.'

व्यवस्था समजून घेणे ,व्यवस्थेला प्रश्न विचारणे ,आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे असच मी मानते. त्या बाबत किरण माने ह्याचे कौतुक आहे. एखादया व्यक्ती ची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो ,चर्चा करू शकतो.. मात्र त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया अनिता दाते यांनी दिली आहे.

किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उमटत आहेत. दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी किरण मानेंनी केलेल्या दाव्याबाबत शंका व्यक्त केली आहे. राजकीय भूमिका घेतल्यानं काढून कसे काय टाकू शकतात असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले की अनेक कलाकार उघड राजकीय भूमिका घेतल्यानतंरही अनेक मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे यामागे वेगळं कारण असू शकतं. तर दुसरीकडे किरण माने यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT