actress bhumi pednekar bhakshak trailer out now sanjay mishra
actress bhumi pednekar bhakshak trailer out now sanjay mishra  SAKAL
मनोरंजन

Bhakshak Trailer: तुम्ही माणूस आहात की भक्षक? भूमी पेडणेकरच्या सिनेमाचा थरारक ट्रेलर रिलीज

Devendra Jadhav

Bhakshak Trailer News:काही दिवसांपुर्वी भूमी पेडणेकरच्या 'भक्षक' सिनेमाचा टीझर रिलीज झाला. या टीझरमधून एका सत्य घटनेवर आधारीत एक ज्वलंत सिनेमा बघायला मिळणार अशी चर्चा आहे.

जबरदस्त टीझरनंतर भूमी पेडणेकरच्या 'भक्षक'चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 'भक्षक' सिनेमात भूमी पेडणेकर निडर पत्रकाराची भूमिका साकारत आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकरचा नवा चित्रपट 'भक्षक' थेट OTT वर प्रदर्शित होणार आहे. 'भक्षक' हा सिनेमा 2018 साली समोर आलेल्या बिहारच्या मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणावर आधारित आहे.

'भक्षक' सिनेमात दाखवलेल्या घटना ही केवळ बिहारच्या मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणाची घटना नाही तर देशात अशा घटना घडतच असतात, असं चित्रपटाचे दिग्दर्शक पुलकित यांचे मत आहे.

'भक्षक' चित्रपटात परखड पत्रकाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणते, "अशा घटना दर दुसऱ्या महिन्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. कोणाच्या तरी आयुष्यातील ही घटना आपल्यासाठी फक्त एक बातमी बनून जाते. या घटना अशा मुलींसोबत घडत आहेत, ज्यांच्या मागे कोणी नाही. अशा कथा माझ्या आयुष्याचा भाग आहेत. मी 'सोनचिरिया' चित्रपटाचे शूटिंग करत असताना चंबळमधील आश्रम दत्तक घेतला. त्या चित्रपटात खुशीची भूमिका साकारणारी मुलगी त्या आश्रमातील आहे."

शाहरुख खानच्या प्रोडक्शन रेड चिलीज अंतर्गत गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी 'भक्षक' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि संजय मिश्राशिवाय आदित्य श्रीवास्तव आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक पुलकित सांगतात, 'भक्षक' चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील कटू वास्तव दाखविण्याचा आमचा उद्देश आहे." हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT