disha patani 
मनोरंजन

दिशा पटानीने शेअर केला तिच्या कुत्र्यासोबतचा 'हा' क्युट व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेत्री दिशा पटानीचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे. ती अनेकदा तिच्या कुत्र्यासोबत फिरताना दिसून येते. एवढंच नाही तर सोशल मिडियावर ती तिच्या कुत्र्याचे फोटो देखील शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या कुत्र्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ खूपंच क्युट आहे.

अभिनेत्री दिशा पटानी सोशल मिडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिच्या चाहत्यांसोबत ती सोशल मिडियावर नेहमीच कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. नुकताच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या कुत्र्याची नखं कापताना दिसतेय. मजेशीर गोष्ट अशी की तिचा कुत्रा न घाबरता, न हालचाल करता अगदी आरामात तिच्याकडून नखं कापून घेत आहे.  

हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. यावर अनेकांनी क्युट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान सेलिब्रिटी घरातल्यांसोबत वेळ घालवत आहेत त्यातंच त्यांच्या या छोट्या दोस्तांची देखील ते काळजी घेताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच दिशाने तिचा बर्थ डे सेलिब्रेट केला होता. अशी चर्चा होती की लॉकडाऊन दरम्यान टायगर आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. टायगर आणि दिशा त्यांच्या रिलेशनशिपविषयी बोलत नसले तरी त्यांच्या अफेअरच्या खूप चर्चा आहेत. दोघंही अनेकदा एकमेकांसोबत दिसून आले आहेत. दिशाचं टायगरच्या आईसोबत देखील चांगलं नातं आहे. 

सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दिशा प्रभु देवाच्या आगामी राधे सिनेमामध्ये दिसून येणार आहे. या सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत असून जॅकी श्रॉफ देखील असणार असल्याचं कळतंय. हा सिनेमा ईदला रिलीज होणार होता मात्र लॉकडाऊनच्या कारणामुळे आता या सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.   

disha patani cuts nails of her dog in latest instagram video  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT