Actress ELnaaz Nourouzi reveals how she was tortured for wearting tight pants
Actress ELnaaz Nourouzi reveals how she was tortured for wearting tight pants Instagrm
मनोरंजन

घट्ट पॅंट घातली म्हणून इराणमध्ये अभिनेत्रीला नेलं पकडून, पुढे जे घडलं ते पाहून..

प्रणाली मोरे

Actress ELnaaz Nourouzi : ईराणमध्ये(Iran) गेल्या काही दिवसांत हिजाबवरनं जोरदार वाद पेटला आहे. ईराणच्या पोलिसांनी २२ वर्षीय मुलगी महसा अमिनीला हिजाब व्यवस्थितरित्या परिधान केला नाही म्हणून अटक केली होती. पोलिसांच्या कैदेत असतानाच मुलीचा मृत्यू झाल्यानं ईराणच्या महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरुन याविरोधात आंदोलनं केली. या प्रकरणानंतर आता ईराणची नागरिक असलेली बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजीनं ईराणची पोलखोल केली आहे. (Actress ELnaaz Nourouzi reveals how she was tortured for wearting tight pants)

अभिनेत्री एलनाज नौरौजीचं पूर्ण कुटूंब इराणमध्ये राहतं. पण ईराणी देशात जे काही सध्या वादाचं वादळ उठलं आहे,आंदोलनं सुरु आहेत त्याकारणानं ती आपल्या कुटुंबाशी संपर्क साधू शकत नाही. आपल्या कुटुंबाची चिंता तिला सतावत आहे. अभिनेत्रीनं आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात अभिनेत्रीनं ईराणची पोलखोल केली आहे. तिनं त्या व्हिडीओत, ईराणमध्ये कशा पद्धतीनं लोकांवर अन्याय केला जातो. त्यांना मारलं जातं याविषयी सांगितलं आहे.

ईराणची नागरिक असलेली एलनाज नौरोजीला देखील तिथल्या पोलिसांच्या अत्याचाराचा सामना करावा लागला आहे. एलनाज जेव्हा ईराणमध्ये राहत होती,तेव्हा ती देखील पोलिसांच्या तावडीत सापडणार होती,पण कशीबशी त्यातनं ती वाचली. अभिनेत्रीनं आपल्या सोबत झालेला तो भीतीदायक किस्सा सांगताना म्हटलं आहे की,महसा अमिनीसोबत जे झालं तसं माझ्यासोबतही घडणार होतं. काही वर्ष आधी मी ईराणमध्ये राहत होती. तेहरानमध्ये माझा तो शेवटचा दिवस होता. मी माझ्या चुलत भावासोबत बाहेर गेले होते,तेव्हा अचानक एक महिला माझ्यासमोर आली आणि विचारु लागली,'हे काय आहे?;, मला आधी कळलं नाही की ती कशाविषयी बोलत आहे,तिनं मला पुन्हा तेच विचारलं,'हे काय आहे?'

अभिनेत्री पुढे म्हणाली,''तिकडच्या पोलिसांनी तेव्हा मला फक्त एक्त एवढ्यासाठी पकडलं होतं की मी घट्ट पॅंट घातली आहे. ती घट्ट असल्यामुळे माझं चुकीच्या पद्धतीनं अंगप्रदर्शन होत आहे,म्हणजे माझ्या शरीराचा आकार त्यातनं दिसत आहे असं त्याचं म्हणणं होतं. मला तेव्हा पोलिस व्हॅनमध्ये बसवून री-एज्युकेशन सेंटरमध्ये नेण्यात आलं. ही तिच जागा,जिथं मृत महसा अमिनीला नेण्यात आलं होतं. मला तोपर्यंत तिथे बसवून ठेवण्यात आलं जोपर्यंत कुणीतरी माझ्यासाठी सैलसर कपडे घेऊन येत नाही''.

अभिनेत्रीनं ईराणची पोलखोल करत म्हटलं की,''जेव्हा मी तिकडे पोहोचले तेव्हा त्यांनी माझा फोन आणि पासपोर्ट माझ्याकडून काढून घेतला. ते लोक ज्यापद्धतीनं घाबरवतात,जसं चुकीचं वर्तन करतात,हे सगळं सहन करत ईराणमध्ये कोणी नाही राहू शकत. कारण तिकडचे पोलिस काहीही कारण नसताना किंवा कुठल्याही फुटकळ कारणासाठी पकडून नेतात. ते महिलांच्या नखांना लावलेली नेलपेंट,कपडे,हिजाब अशा गोष्टींवरनं देखील पकडून नेतात''.

अभिनेत्री पुढे म्हणाली,''कोणत्याही महिलेला अशी वागणूक मिळणं चूकीचं आहे. मी हे फक्त एवढ्याचसाठी सांगते कारण निव्वळ २२ वर्षाच्या महसा अमिनीसोबत जे चुकीचं घडलं ते माझ्यासोबतही घडलं असतं. हे ईराणमधील कोणत्याही महिलेसोबत होऊ शकतं आणि हे खूपच भयावह आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT