साऊथस्टार विक्रमचं 2 मिनिटाचं भाषण तुफान व्हायरल,भारताच्या इतिहासावर असं काय बोलला?

साउथचा सुपरस्टार चियान विक्रम 'पोन्नियन सेल्वन भाग १' मध्ये आदित्य कारिकलन ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
Chiyaan Vkram fiery speech about indian culture and cholas goes viral from ponniyin selvan mumbai event
Chiyaan Vkram fiery speech about indian culture and cholas goes viral from ponniyin selvan mumbai eventGoogle

Chiyaan Vkram : साउथचा सुपरस्टार चियान विक्रम पोन्नियन सेल्वन भाग १ मध्ये आदित्य कारिकलन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मणिरत्नमच्या या सिनेमाची सगळेच प्रेक्षक चातकासारखी वाट पाहत आहेत. ३० सप्टेंबर रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगची सुरुवात आधीच झाली आहे. सिनेमाची कहाणी चोल वंशाच्या साम्राज्यावर आधारित आहे. सिनेमाचं प्रमोशनही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुंबईत प्रमोशन निमित्तानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चियान विक्रमने दोन मिनिटाचं एक भाषण दिलं ज्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. (Chiyaan Vkram fiery speech about indian culture and cholas goes viral from ponniyin selvan mumbai event)

Chiyaan Vkram fiery speech about indian culture and cholas goes viral from ponniyin selvan mumbai event
गोल्डर्न गर्ल बनलेल्या रश्मिकानं दिल्या किलर पोझ..

विक्रमने आपल्या भाषणात चोल साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करत म्हटलं की,जेव्हा इंग्लंड आणि इतर देश अंधारात बुडाले होते तेव्हा हिंदुस्थान मात्र चमकत होता. त्यानं यावेळेला तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराचा उल्लेखही आपल्या भाषणात केला.

चियान विक्रमच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की हा व्हिडीओ अमेरिका आणि इंग्लंडचे गोडवे गाताना थकत नाहीत अशांना भारताच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देत, त्यांच्या डोळ्यात अंजनही घालेल.

Chiyaan Vkram fiery speech about indian culture and cholas goes viral from ponniyin selvan mumbai event
हॉट...'चहा' की 'तितिक्षा'...

विक्रम व्हिडीओत म्हणताना दिसत आहे,''आपण सगळे इजिप्तला पिरॅमिड्स पाहण्यासाठी जातो,पीसाचा झुकलेला मनोरा पाहतो. आपण पीसा पाहतो,खूश होतो,आपण एका अशा इमारतीची प्रशंसा करतो जी सरळ उभी सुद्धा नाही,झुकलेली आहे. आपण त्याच्यासमोर सेल्फी घेतो,फोटो काढतो आणि खूश होतो. पण आपल्या भारतात तर पुरातन काळापासून अशी मंदिरं आहेत,ज्यांना बनवण्यासाठी प्लास्टरचा देखील वापर केला गेलेला नाही''.

Chiyaan Vkram fiery speech about indian culture and cholas goes viral from ponniyin selvan mumbai event
अहमदनगरचा जयेश खरे एका गाण्याने व्हायरल झाला अन् थेट अजय-अतुल पर्यंत पोहोचला....

तंजावरच्या बृहदेश्वर मंदीराविषयी बोलताना विक्रम पुढे म्हणाला,''या मंदीरात क्रेनचा वापर न करता कितीतरी टन वजानाचा मोठा खडक उंच स्तंभावर बसवला गेला. या मंदीरानं आतापर्यंत खूप भूकंप झेलले आहेत''. विक्रम ज्या बृहदेश्वर मंदीराविषयी बोलला,त्याला युनेस्कोनं देखील गौरविलेलं आहे. ग्रेनाइटपासून बनलेलं हे जगातलं एकमेव मंदीर आहे. हे मंदीर तामिळ आर्किटेक्चरचा एक उत्तम नमुना आहे.

विक्रम आपल्या भाषणात पुढे म्हणाला की,''सम्राट राजाराजा चोलाननं आपल्या कारकिर्दीत ५००० बांध बांधले, लोकांना कर्जमुक्त केलं, मोफत रुग्णालय सेवा दिली,पंचायतीच्या निवडणुका घेतल्या,शहरांची नावं महिलांच्या नावावर ठेवली. हे ९ व्या शतकात झालं होतं. जेव्हा आपण समुद्रमार्गानं बाली-मलेशिया पर्यंत पोहोचलो होता. विचार करा तेव्हापासून पुढे ५०० वर्षांनंतरही कोलंबसने अमेरिकेचा शोध नव्हता आला. मग आपण किती पुढे होतो,आपली संस्कृती किती महान होती,आपल्याला यावर गर्व हवा. उत्तर भारत-दक्षिण भारत असं काही नसतं. आपण भारतीय आहोत आणि आपल्याला फक्त याचाच अभिमान असायला हवा''.

Chiyaan Vkram fiery speech about indian culture and cholas goes viral from ponniyin selvan mumbai event
शाहरुखच्या शर्टलेस फोटोची बायकोनेच उडवली खिल्ली, चाहत्यांची तर हसून पुरती वाट...

'पोन्नियन सेल्वन -1' ३० सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात चियान विक्रमसोबतच ऐश्वर्या राय बच्चन,कार्थी,जयम रवि,त्रिशा,प्रकाश राज सारखे सुपरस्टार्स दिसणार आहेत. सिनेमा तामिळमध्ये चित्रित केला आहे आणि याचं हिंदी व्हर्जन रिलीज केलं जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com