actress fatima shaikh celebrated birthday today she says never want to get married 
मनोरंजन

मला कधीच लग्न करायचं नाहीये, 'दंगल' गर्लनं ' सांगितलं कारण...

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कलावंत म्हटला की तो थोडासा लहरी आलाच. त्याचे वेगवेगळे मुडस्विंग पाहून अनेकदा त्याचे चाहतेही बुचकाळ्यात पडतात. प्रत्येक कलाकार त्य़ाची विचारधारा वेगळी असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दंगल गर्ल फातिमा सनानं जे वक्तव्य केलं आहे त्यावरुन ती वादाच्या भोव-यातही सापडली आहे.

फातिमा आज आपला जन्मदिवस साजरा करत आहे. दंगल चित्रपटामुळे प्रसिध्दीस आलेल्या फातिमाला त्यानंतर अनेक चित्रपट मिळाले. एक अभिनेत्री म्हणून आपला वेगळा ठसा उमटविण्यात ती यशस्वी झाली आहे. 11  जानेवारीला हैद्राबाद याठिकाणी जन्म झालेल्या फातिमाची ओळख दंगल गर्ल मधून ठळकपणे जाणवली. कमी वयात वाट्याला आलेली प्रसिध्दी यामुळे जास्त वाहवत न जाता रोखठोकपणे भूमिका मांडणारी अभिनेत्री म्हणूनही फातिमाचा उल्लेख करावा लागेल. तुम्हाला माहिती नसेल फातिमा ही चाची 420, वन टू का फोर. दिलवाले सारख्या चित्रपटांत बालकलाकार म्हणून दिसली आहे.

एका मुलाखती दरम्यान फातिमानं लग्नाविषयी आपले परखड विचार व्यक्त केले होते. ती म्हणाली होती की मला कधीही लग्न करायचे नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिनं असे सांगितले होते, अजून लग्न करण्याचा माझा काहीही विचार नाहीये. अजून मी लहान आहे. मला सुखानं जगु द्या. जेव्हा तिला लग्नाविषयी विचारण्यात आले तेव्हा मात्र तिनं स्पष्टपणे कधीही करणार नाही. त्यावर माझा विश्वासच नाही. मला त्याबाबत असे वाटते, ज्यावेळी तुम्हाला कोणाबरोबर राहावेसे वाटते तेव्हा तुम्हाला लग्नासाठी कुठल्या एका कागदपत्राची गरज नाही.

लग्नं केले म्हणजे तुमच्या त्या व्यक्तीवर प्रेम असतेच असे नाही. मी थोड्या मोकळ्या विचारांची आहे. फातिमानं दंगल नंतर आमीरच्या ठग्स ऑफ हिंदुस्थानमध्येही काम केले होते. बिग स्टार असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यानंतर मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये आलेल्या लूडो आणि सूरज पे मंगल भारी या चित्रपटातही दिसली होती.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT