actress Gautami Deshpande shared video of her food order stole sakal
मनोरंजन

Gautami Deshpande भडकली! व्हिडिओ शेयर करत म्हणाली.. अन्न चोरी करणं हे..

अभिनेत्री गौतमी देशपांडे सोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडिओ शेयर करत दिली माहिती.

नीलेश अडसूळ

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची धाकटी बहीण आणि 'झी-मराठी'वरील 'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे हल्ली चर्चेत असते ते तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे. ती सध्या रिल्स मुळे सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. दोघी बहिणी सतत काहीतरी नवीन पोस्ट करत असतात. आज जे गौतमीने शेयर केलंय ते पाहून अनेकांची झोप उडाली आहे.

(actress Gautami Deshpande shared video of her food order stole)

गौतमीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. गौतमीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत तिची फूड ऑर्डर चोरीला गेल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ पोस्ट करत तिने आपला संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओ शेअर करत गौतमीनं लिहिलं आहे की, 'मी आज तिरामिसूची ऑर्डर दिली होती. जवळपास 1 तास वाट पाहिल्यावर मी डिलिव्हरी बॉयला फोन केला. तेव्हा ते पार्सल चोरीला गेल्याचं त्याने मला सांगितलं. पहिल्यांदा माझा विश्वास बसला नाही. पण नंतर त्याने थेट पार्सल चोरीला गेल्याचा व्हिडीओच पाठवला. एखाद्याचं अन्न चोरणं आणि नंतर हसणं हे किती लज्जास्पद आहे,' अशा शब्दात ती व्यक्त झाली आहे.

हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

गौतमीने हे फूड स्विगि वरुन मागवलं होतं. त्यामुळे तिने स्विगिलाही पोस्टमध्ये टॅग केलं आहे. गौतमीच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे. तिचे चाहतेही आपापले अनुभव शेयर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT