Riteish - Genelia Deshmukh:  Esakal
मनोरंजन

Riteish - Genelia Deshmukh: "माझी मराठी सुधारल्याबद्दल..", जिनिलीयाची सासूबाईंसाठी खास पोस्ट!

Vaishali Patil

Riteish - Genelia Deshmukh: बॉलिवूडमधील मोस्ट रोमँटिक आणि मराठमोळं कपल म्हणजे जेनेलिया आणि रितेश देशमुख. या दोघांना महाराष्ट्राचं फेव्हरेट कपल म्हटलं जातं. रितेश आणि जेनेलियाची गणना बॉलिवूडमधील रोमँटिक जोडप्यांमध्ये केली जाते.

दोघांची जोडी चाहत्यांना खूपच आवडते. जेनेलिया मनोरंजन विश्वात सक्रिय असली तरी ती घर आणि मुलांचं संगोपण अतिशय उत्तमरित्या करते. जेनेलिया सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.

ती रितेशसोबत अनेक गमतीशीर व्हिडिओ शेयर करत असते. आता जेनेलियाने आपल्या लाडक्या सासूबाईंसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे.

आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. वैशाली देशमुख या रितेशच्या आई आणि जेनेलियाच्या सासूबाई आहेत.

जेनेलिया आणि वैशाली देशमुख यांचे नाते हे सासू सुनेपेक्षापण लई भारी आहे. जेनेलिया सासूबाईंना आई म्हणते तर वैशाली देखील तिचे मुलीप्रमाणे लाड करतात.

वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोत तिची दोन्ही मुलं आणि सासूबाई दिसत आहेत.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये जेनेलिया लिहिते की, "'प्रिय आई, एक पुरोगामी विचारांची स्त्री कशी असते हे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद, माझ्यावर स्वतःच्या मुलीसारखे प्रेम केल्याबद्दल धन्यवाद, माझे मराठी दररोज सुधारल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वात महत्वाचं माझी आई असल्याबद्दल धन्यवाद....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.. तुमच्यासारखं कुणीच असूच शकत नाही'

तर अभिनेता रितेश देशमुखने देखील आपल्या लाडक्या आईसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये रितेश लिहितो की, "लव्ह यू आई! तूच आमचं जीवन आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा". या पोस्टमध्ये रितेशने एक फॅमिली फोटो शेयर केला आहे.

सध्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या दोघांच्या पोस्टला कमेंट करत आहे. अनेकांनी जेनेलिया आणि वैशाली देशमुख यांच्या नात्यातील प्रेमाचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT