hemangi kavi 
मनोरंजन

अभिनेत्री हेमांगी कवीने पुरुषांच्या अस्वच्छतेवर व्यक्त केला संताप, 'वेस्टर्न टॉयलेट कसं वापरावं हे कळत नसेल तर...'

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ नेहमीच तिच्या परखड बोलण्याने ओळखली जाते. सोशल मिडियावर अनेक विषयांवर तिने स्वतःचं परखड मत मांडलं आहे. आता पुन्हा एकदा हेमांगीने असाच एक मुद्दा सगळ्यांसमोर आणला आहे. नाट्यगृहातील टॉयलेट आणि त्याची अस्वच्छता यावर अनेक सेलिब्रिटींनी आत्तापर्यंत आवाज उठवला आहे. मात्र केवळ नाट्यगृहच नाही तर अनेक ठिकाणी सार्वजनिक टॉयलेट्सच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. असाच हेमांगीला आलेल्या अस्वच्छतेचा अनुभव तिने फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. 

अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर पोस्ट करत पुरुषांच्या अस्वच्छतेवर संताप व्यक्त केला आहे. हेमांगीने लिहिलंय, 'हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी western toilets (commode) असतात. त्यात काही common toilets म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकच toilet असतं. अश्यावेळी ते toilet कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहानवयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं. अत्यंत गरजेचा विषय आहे समजून!'

'पुरुष मूत्र विसर्जन करताना commode च्या ring वर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अश्या घाणेरड्या commode वर त्या कश्या बसत असतील? बसत नसतील तर मग कशा manage करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळी ( #periods, menustral cycle) च्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का? होत नसेल तर करावा. '

यापुढे जाऊन हेमांगीने पुरुषांना वेस्टर्न टॉयलेट्स वापरता येत नसतील तर त्यांनी काय करावं हे देखील सांगितलं आहे. हेमांगी लिहिते,   'स्त्री पुरुष दोघांनी! #Commode कसं वापरावं हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही hygiene, health शी असतो! सगळ्यांनी या विषयी openly बोलावं! कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर flush ही करत नाहीत..पुरुषांनी मूत्र विसर्जन करताना commode ची रिंग (frame) वर करून आपला कार्यभाग उरकून flush करून झाल्यावर पुन्हा ती frame toilet seat वर पाडायची असते. Commode seat स्वच्छ, कोरडं कसं राहील याकडे लक्ष द्यावं! व्यवस्थित #flush झालंय की नाही ते पाहावं जेणे करून दुर्गंधी येऊन जीव गुदमरून जाऊ नये याची खात्री करून मगच बाहेर पडावं.'

हेमांगीने ज्या विषयाबद्दल बोलायला लाजतात त्यावरंच थेट भाष्ट केलं आहे. इतकंच नाही तर तीने स्वतः देखील वेस्टर्न टॉयलेट कसं वापरावं हे सांगितलं आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांनी तिचं या विषयावर उघडपणे बोलल्याबद्दल कौतुक केलं आहे.    

actress hemangi kavi dhumal angry western toilet clean hygiene    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT