actress hemangi kavi shared post about her husband sandeep dhumal and his profession dop  
मनोरंजन

कधी कधी हे शहाणे आपल्याला निरुत्तर करून जातात, हेमांगी कवीची नवऱ्यासाठी खास पोस्ट

अभिनेत्री हेमांगी कवीने आज आपल्या नवऱ्याच्या कामाविषयी भरभरून लिहिलं आहे.

नीलेश अडसूळ

hemangi kavi: हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे बऱ्याचदा तिला खूप ट्रॉल केले जाते. तर कधी तिच्या बेधडकपणामुळे कौतुकाची थापही तिला मिळते. आज हेमांगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आजची तिची पोस्ट खूप खास आहे. आज तिने आपल्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. 'यहां कौन विक्रम कौन वेधा?' असं म्हणत तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (actress hemangi kavi shared post about her husband sandeep dhumal and his profession dop)

हेमांगी कवी म्हणजेच हेमांगी कवी धुमाळ. तिचे पती संदीप धुमाळ हे देखील कलाकार असून मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय आहेत. ते 'डिओपी' म्हणजेच दिग्दर्शकाला अपेक्षित असलेलंदृश्य साकारण्यासाठी ते कॅमेराचे दिग्दर्शन करतात. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांसाठी काम केलं आहे. नवऱ्याचा कॅमेऱ्यासोबतचा एक फोटो शेअर करत हेमांगीने खास कॅप्शन दिले आहे.

हेमांगी म्हणते, 'मला वाटतं Dop (director of photography), cinematographer, छायाचित्रकार आणि Camera चं नातं विक्रम वेताळासारखं आहे. कधी dop कॅमेऱ्याच्या मानगुटीवर तर कधी camera, dop च्या! कोण कुणाला स्टोऱ्या सांगत असतं कुणास ठाऊक? आपण मात्र यांच्या स्टोऱ्यांमध्ये गुरफटून प्रश्न उत्तराचा खेळ खेळू लागतो. कधी कधी उत्तर बरोबर असतं तर कधी चूक. कधी उत्तर मिळतं तर कधी कधी हे शहाणे आपल्यालाच निरुत्तर करून जातात किंवा नवीन प्रश्नांना जन्म घालून जातात. Camera शिवाय dop नाही, dop शिवाय camera नाही! Director, writer, actor ला स्वतःच्या स्टोऱ्या सांगायला अनेक माध्यमं आहेत पण Dop ला? गम्मत आहे नाही सगळी!' असं ती म्हणते.
(hemangi kavi post on dop camera man and cinematographer)

हेमांगीची ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हेमांगी आणि तिचे पती संदीप दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. ती बऱ्याचदा आपल्या नवऱ्याविषयी लिहीत असते. पण आज तिने पतीच्या प्रोफेशनविषयी लिहिले आहे. ती स्वतः कलाकार असल्याने तिला कॅमेरा आणि त्याचे महत्व चांगलेच ठाऊक आहे, म्हणूनच तीची ही पोस्ट सर्वांना भावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT