actress Kananga ranaut said i challenged Diljit Dosanjh to say he is not Khalistani but he didnt reply 
मनोरंजन

ओपन चँलेज; 'हिंमत असेल तर मी खलिस्तानी नाही हे एकदा म्हणून दाखव' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री कंगणा राणावत आणि गायक दिलजीत यांच्यातील शाब्दिक युध्दाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावरुन त्यांच्यात वाद रंगला होता. तो वाद एवढा टोकाला गेला की त्या दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप करण्यास सुरुवात केली होती. सध्या देशात शेतकरी बांधव दिल्लीत जे आंदोलन करत आहेत त्याचे जगभर पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. जगातील काही महत्वाच्या सेलिब्रेटींनी त्यावर टीका केल्यानं सगळयांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. अशा वातावरणात कंगणानं दिलजीतला पुन्हा एकदा ओपन चँलेज केले आहे. ते सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहे.

कंगणानं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यात तिनं दिलजीत आणि त्यानं शेतकरी आंदोलनाला दिलेला पाठींबा याच्यावर सडकून टीका केली आहे. दोघांमध्ये वाद पुन्हा पेटला आहे. त्या मुलाखतीत कंगणा म्हणाली की, मी दिलजीतला ओपन चँलेज केले होते त्यात त्याला सांगितले होते, तु फक्त एकदाच मी खलिस्तानी नाही असे म्हणून दाखव. मात्र त्यानं तसे केले नाही. तरुणांना चूकीच्या दिशेनं नेण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. खलिस्तानच्या विषयी त्यांना वेगवेगळी स्वप्नं दाखवली जात आहेत. यामुळे प्रभावित झालेले तरुण त्यांच्या हाती निराशेशिवाय काही लागत नाही. मात्र हे त्यांच्या लक्षात येईपर्यत बराच उशीर झालेला असतो.

कंगणा म्हणाली, माझ्यावर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मात्र मी त्याचे वाईट वाटून घेतले नाही. कारण मला माहिती आहे की, सत्याच्या बाजूनं बोलल्यावर त्याची किंमत आपल्याला चूकवावी लागते. मी जे काही करत आहे ते देशासाठी आहे. त्यासाठी मला कित्येकांकडून प्रतिसाद मिळतो. प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे अशाप्रकारचे सकारात्मक काम करण्याचे मला बळ मिळते.  कंगणानं सोशल मीडियावर दिलजीतला खलिस्तानी असे म्हटले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती. 

दिलजीतवर टीका करताना कंगणा म्हणाली होती की. हा देश काही केवळ खलिस्तानी लोकांचा नाही. तो सर्वांचा आहे. दिलजीतनं फक्त एकदाच सर्वांसमोर सांगावे की, तो खलिस्तानी नाही म्हणून. आणि ज्या खलिस्तानी लोकांनी त्या आंदोलनात भाग घेतला त्यांचे मी समर्थन करत नाही. जर तो असे म्हणाला तर मी म्हणेल की तो खरा देशभक्त आहे. यावर मी त्याची माफीही मागायला तयार आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT