actress kangana ranaut lashes out at maharashtra cm uddhav thackeray to close cinema halls for one month not virus business will stop 
मनोरंजन

थिएटर बंद करण्यानं बिजनेस बंद होईल, व्हायरस नाही; कंगणाची मुख्यमंत्र्यांवर टीका 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनामुळे सध्या परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे सर्वांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चालू महिना सर्वांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. या कारणास्तव सरकारनं लॉकडाऊन केला आहे. काही जिल्हयांमध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे. लोकांना घरी  राहण्यासाठी आवाहन केले जात आहे. अशातच मनोरंजन क्षेत्रापुढील प्रश्न आणखी जटील होत आहे. आता कुठे समाधानकारक चित्र निर्माण झाले असताना पुन्हा सगळे बंद करण्याची वेळ आली आहे. अशावेळी थिएटर चालकांपुढे मोठ्या अडचणी तयार झाल्या आहेत. त्याविषयी अभिनेत्री कंगणानं मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. तिनं थिएटर चालकांच्या बाजूनं काही वक्तव्य केली आहेत.

महाराष्ट्रात सध्या कोरोनानं सर्वांची झोप उडवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी या लॉकडाऊनचा फटका थिएटरचालकांना बसल्याचे दिसून आले आहे. रविवारी थिएटर चालकांच्या मंडळानं मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधला आहे. त्यावेळी अभिनेत्री कंगणानं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयवार तिखट प्रतिक्रिया दिली आहे.  राज्याची सध्याची परिस्थिती पाहता ती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्य शासनानं अंशिक लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक व्यवस्थेवर बंधनं आली आहेत. लोकांना आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासगळ्या प्रकरणावर कंगणानं लिहिलं आहे की, मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्यानंतर थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ये सर्व आपल्यासाठी लज्जास्पद आहे. जगातील सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री कोरोनाचा बिमोड करण्यासाठी पूर्ण एक आठवड्याचा लॉकडाऊन का केला जात नाही? सध्या ज्याप्रकारे लॉकडाऊन करण्यात आला आहे त्यातून काहीही साध्य होणार नाही. त्यातून फक्त बिजनेस बंद होईल. बाकी काही नाही. थिएटर चालकांची जी मीटिंग झाली त्यात त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती..

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मल्टिप्लेक्स संचालकांनी तीन वर्षापर्यत प्रॉपर्टी टॅक्समधून सुट मिळावी, एक वर्षापर्यत वीजबिलातून सुट, पाच वर्षांपर्यत परवान्याचे नुतनीकरण आणि तीन महिने थिएट्रीकल रिलिज करु देण्याची मागणी केली होती.  राज्यात सर्वाधिक थिएटर यांना कोरोनाचा फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनचा मोठा वाटा मुंबईतून जातो. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT