actress kangana ranaut tweet against hritik roshan affair time 
मनोरंजन

' कब तक रोएगा एक छोटेसे अफेअर के लिए '

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - काईट चित्रपटापासून कंगणा आणि ऋतिकचं प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली असे म्हटलं गेलं. दोघांचे एकत्र असलेले फोटो त्यावेळच्या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्नाची मागणी घालणे हे सगळे सुरु होते. त्या दरम्यान ऋतिकची पत्नी हिनं निघुन जाणं यामुळे त्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. कंगणानं पुढे ऋतिकनं पाठवलेल्या मेलचे स्क्रिन शॉट शेयर केले आहेत. ते आपले नाहीत असे सांगुन ऋतिक सायबर शाखेकडे गेला होता.

मुंबई सायबर शाखेनं आता या प्रकरणाचा तपास सीआययु (गुन्हे शाखा) गुन्हे शाखेच्या गुप्त वार्ता विभागाकडे देण्यात आला आहे. त्यानंतर कंगणानं व्टिट करुन ऋतिकवर आगपाखड केली आहे. सोशल मीडियावर तिनं केलेल्या पोस्टवरुन चर्चेला सुरुवात झाली आहे. ऋतिकवर टीका करताना कंगणा म्हणाली,  पुन्हा एकदा ऋतिकनं सुरुवात केली आहे. खूप वर्षांपूर्वी आमचं ब्रेक झाले होते. त्यानंतर त्याचा घटस्फोट झाला होता. आणि याप्रकरणावर पडदाही पडला होता. आता त्यावर मी पुन्हा मला जगण्यासाठी काही नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे तर वेगळचं चित्र समोर दिसत आहे.

ऋतिकनं पुन्हा एकदा त्याच्या नाटकाला सुरुवात केली आहे. मला त्याला सांगायचे आहे की, एका छोट्याशा अफेअरसाठी आणखी किती वेळ रडत बसणार आहेस ? अशा शब्दांत कंगणानं ऋतिकची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे पुन्हा या दोघांमध्ये शाब्दिक वॉर सुरु झाले आहे. यानंतर ऋतिकनं सायबर पोलिसांकडे धाव घेतली होती. तर  हृतिकच्या वकिलांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास पुढे न्यावा, अशी विनंती केली होती. त्यावर तो तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. 

2016 मध्ये हृतिकच्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करून त्याद्वारे अभिनेत्री कंगणाशी मेलव्दारे संपर्क साधण्यात आल्याची तक्रा र हृतिकने दाखल केली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. या घडामोडीनंतर हृतिक आणि कंगना यांनी एकमेकांविरोधात बऱ्याच तक्रारी केल्या होत्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT