actress kangana ranaut wishes eid mubarak to her fans but got troll
actress kangana ranaut wishes eid mubarak to her fans but got troll  esakal
मनोरंजन

'तू दोन धर्मात भांडण लावतेस…'; ईदच्या पोस्टमुळे कंगना ट्रोल

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील काँट्रवर्सी क्वीन कंगना रणौत तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतरच्या हिंसाचारावर तिने सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले. ट्विटरवरून बॅन झाल्यानंतर कंगनाने तिची मत मांडण्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफार्मचा आधार घेतला. नुकतेच तिने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. रॉयल लूकमधील तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवरून तिला ट्रोल केले जात आहे.

कंगना देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर तिचे मत मांडते. यावरून तिला नेटकरी नेहमी ट्रोल करतात. नेटकऱ्यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंटस् करुन कंगनाला ट्रोल केले आहे. एका युजरने ''ईदच्या मुहूर्तावर तू एक शपथ घे की यानंतर तू माणूस म्हणून वागशील' असे म्हंटले तर, दुसऱ्याने,''कंगना, तू काय शुभेच्छा देतेस, तू दोन धर्मांमध्ये भांडणे लावतेस'' अशी कमेंट केली. ''ताई, तू सगळं पोस्ट करते आणि निघून जातेस आणि इथे भक्तांना ट्रोल केले जाते.''अशीही कॉमेंट आणखी एका यूजरने केली आहे.

काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि पॅलिस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर देखील कंगनाने तिचे मत व्यक्त केले होते. तिने लिहिले होते, 'कट्टर इस्लामी दहशतवादाच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धात भारताने इस्रायलची साथ दिली आहे. आपल्या देशाला आणि नागरिकांना दहशतवादापासून वाचवणे हे प्रत्येक राष्ट्राचा मूलभूत अधिकार आहे. या प्रकरणात भारताने इस्रायलची साथ दिली आहे.'' गंगा नदीमध्ये वाहून आलेल्या मृतदेहांच्या विषयावर देखील तिने मत मांडले. कंगनाच्या या सर्व वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकांऊट बॅन करण्याची मागणी अनेक नेटकरी काही दिवसांपूर्वी सरकारकडे करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT