actress kareena kapoor khan share first post after becoming mother of baby boy says i missed you all 
मनोरंजन

तैमूरची आई म्हणे, मी तुम्हा सगळयांना खूप मिस केलं

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई- गेली अनेक दिवसांपासून करिना कपूर ही तिच्या दुस-या बाळंतपणासाठी चर्चेत आली होती. दरम्यानच्या काळात तिचा चाहत्यांशी संपर्क तुटला होता. आता तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बाळंतपणानंतर ती पहिल्यांदाच चाहत्यांशी संवाद साधत होती. करिनाने नुकताच दुस-या मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी ऐकताच तिच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

दुस-यांदा आई झालेल्या  करिनानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिनं म्हटलं आहे की, मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं त्यावेळी. मुलगा झाल्यानंतर काही दिवसांनी ती सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. तिनं तिचा एक फोटो शेअर केला आहे. करिनानं म्हटलं आहे की, मी माझ्या चाहत्यांना खूप मिस केलं होतं. जेव्हा मला काही दिवस मला त्यांच्याशी बोलायला मिळाले नव्हते. त्यावेळी करिनाला तिच्या चाहत्यांनी हॅलो असे म्हटले आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर करिना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली आहे.

करिना कपूरही स्वीमिंग पूलच्या जवळ बसली असून तिनं डोक्यावर एक बांबु कॅप घातली आहे. करिनानं एक फोटोशुट केलं असून त्याला मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. त्याचबरोबर करिनानं आपल्या नव्या घराचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात करिना आणि सैफ यांनी मीडियासमोर फोटोसाठी काही पोझ दिल्या आहेत. तसेच कोविडच्या काळात काय काळजी घ्यायला हवी असेही सांगितले आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करिना इंस्टावरही जास्त अॅक्टिव्ह आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीच्या आधारे, करिनाला आपल्या बाळाचे फोटो मीडियासाठी द्यायचे आहेत. त्यासाठी तिनं खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे असे आहे की, करिनाला आपल्या बाळाच्या सुरक्षेच्या कारणास्तव कुठलाही धोका पत्कारायचा नाही. त्यामुळे तिनं अद्याप कुठल्याही प्रकारचे जाहिर भाष्य केलेलं नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT