actress kshitee jog play sunny chi boss in sunny marathi movie directed by hemant dhome cast lalit prabhakar  sakal
मनोरंजन

Sunny: क्षिती जोग साकारणार जीगरवाली बाई.. हा व्हिडिओ बघाच!

‘सनी’ चित्रपटाच्या च्या निमित्ताने क्षिती जोग आणि ललित प्रभाकर पुन्हा एकत्र!

नीलेश अडसूळ

kshitee jog: सध्या चर्चा आहे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटाची. 'झिम्मा'च्या प्रचंड यशानंतर हा चित्रपट येणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटात 'सनी'ची भूमिका ललित प्रभाकर करणार असून इतर भूमिकांच्या चेहरे आता समोर येऊ लागले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री क्षिती जोगही अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे.

बिनधास्त, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती अशी वैदेही ‘सनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेहीची भूमिका क्षिती जोग साकारणार असून यात तीला जीगरवाली बाई असं म्हणण्यात आलं आहे.

कॅफे मालक असलेली वैदेही सनीसोबत कधी कठोर वागताना दिसत आहे, तर कधी त्याची काळजीही घेताना दिसत आहे. सनी आणि वैदेहीमध्ये कामासोबतच भावनिक नातं निर्माण झाल्याचेही दिसतेय. त्यांच्या नात्यातील नेमकी गंमत ‘सनी’ पाहिल्यावरच उलगडेल. दरम्यान या दोघांमधील केमिस्ट्री पडद्यावर उत्तम दिसत आहे. क्षिती जोग आणि ललित प्रभाकरने नाटक आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती आणि ललित आता चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत.

यापूर्वी क्षिती जोग आपल्याला ‘झिम्मा’ चित्रपटात दिसली मिता जहांगिरदार ही व्यक्तिरेखा साकारणारी क्षिती यात थोडी गोंधळलेली, घाबरट अशी दिसली. मितावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता या भूमिकेच्या अगदी विरूद्ध अशी ‘सनी’मधील तिची भूमिका आहे आणि ही भूमिकाही तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ललित प्रभाकर, क्षिती जोग यांच्यासह चिन्मय मांडलेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT