Actress Kshitee Jog's Facebook account hacked, obscene video viral rocky aur rani ki prem kahani  SAKAL
मनोरंजन

Kshitee Jog: धक्कादायक! अभिनेत्री क्षिती जोगचं फेसबुक अकाऊंट हॅक, पेजवरुन अश्लील व्हिडीओ व्हायरल

क्षिती जोगचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आलीय

Devendra Jadhav

मराठमोळी अभिनत्री आणि नुकतंच रॉकी और रानी की प्रेम कहानी या बॉलिवूड सिनेमात झळकलेली क्षिती जोगच्या आयुष्यात धक्कादायक गोष्ट घडली आहे. क्षिती जोगचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आलीय.

क्षिती जोगचा नवरा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमेने ही माहिती सोशल मिडीयावर शेअर केलीय.

(Actress Kshitee Jog's Facebook account hacked)

हेमंत ढोमेने शेअर केली पोस्ट

"चलचित्र मंडळीच्या निर्माती, अभिनेत्री क्षिती जोग यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. पेजवरून काही अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. फॉलोवर्सना विनंती आहे की, अशा पोस्टकडे आपण दुर्लक्ष करावे. आम्ही पेज सुरळीत होण्यासाठी कार्यरत आहोत. तरी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी संयम ठेवावा ही विनंती. आपल्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर

- चलचित्र मंडळी"

अशी पोस्ट करत हेमंत ढोमेने ही माहिती शेअर केलीय.

क्षिती जोग बॉलिवूडमध्ये चमकली

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने या चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. चित्रपटातील नामवंत चेहऱ्यांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, म्हणजेच क्षिती जोगचा.

सध्याच्या आघाडीच्या दोन पिढ्यांच्या नटांसोबत क्षिती चमकली

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याबद्दल क्षिती जोग म्हणते, '' यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केले आहे आणि ते काम मी एन्जॉयही केले आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण आहे. या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेची इतकी दखल घेतली जात आहे, हे माझ्यासाठी खूप सुखावणारे आहे. मला या चित्रपटात दोन वेगळ्या पिढीतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. आपण केलेल्या कामाचे दिग्गजांकडून, चाहत्यांकडून कौतुक होणे, हे एका कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मौल्यवान असते. एका कलाकाराला आणखी काय हवे असते. या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. खूप शिकता आले. एकंदरच हा अनुभव माझ्यासाठी कमाल होता.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : प्रमाणपत्र मिळाले तरी वैधता कठीण, जीआर कोर्टात टिकणार का? संभाजी ब्रिगेडला शंका

Ichalkaranji Politics : इचलकरंजीत शिंदे गट, भाजपचे टेन्शन वाढवणार? ३५ जागांची केली चाचपणी; महायुतीसाठी वजनदार मंत्र्यांच्या घरी बैठक

Post Office Scheme : आता हॉस्पिटलच्या खर्चासाठी काढावे लागणार नाही कर्ज, टपाल विभागाची 'ही' योजना आहे खास; ५ लाखांपर्यंत होणार उपचार

Larry Ellison: हवेली-रिसॉर्ट ते स्वत:च्या नावावर एक बेट; लॅरी एलिसन यांच्या जगभरातील प्रसिद्ध प्रॉपर्टीज कोणत्या?

Latest Marathi News Updates : सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर

SCROLL FOR NEXT