मनोरंजन

पती नव्हे अभिनेत्री पत्नीच 'मास्टरमाईंड'; ईडीचा धक्कादायक खुलासा

दोनशे कोटीचा अपहार केल्याप्रकरणी ईडीनं (ed) सुकेश चंद्रशेखरला (sukesh chandrashekhar) अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - दोनशे कोटीचा अपहार केल्याप्रकरणी ईडीनं (ed) सुकेश चंद्रशेखरला (sukesh chandrashekhar) अटक केली आहे. याप्रकरणांतून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याप्रकरणात काही बॉलीवूड सेलिब्रेटींची नावंही समोर आली आहे. त्यामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ (jacqueline fernandez) आणि नोरा फतेही (nora fatehi) यांच्या नावाचा समावेश आहे. यानंतर सुकेशच्या पत्नीच्या बाबत एक महत्वाची आणि तितकीच धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे सुकेशच्या (sukesh chandrashekhar) अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

सध्या एएनआयचा एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी एका आरोपपत्राचा दाखला दिला आहे. त्यात नमुद केल्यानुसार, सुकेश चंद्रशेखरची पत्नी ही मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. तिच्याविरोधात बरेचसे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. मात्र असे असतानाही लीनानं चौकशीला सामोरं जाण्यास टाळले आहेत. जसं तिला पतीच्या अटकेची चाहूल लागली तोच तिनं महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचे सांगण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये असेही सांगण्यात आले आहे की, आरोपी अरुण मुथू, आनंद मुर्ती आणि जगदीपनं लीनाविषयीची बरीचशी माहिती तपासयंत्रणेला सांगितली आहे.

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, तपास करणाऱ्यांना चंद्रशेखर आणि पिंकी इराणीला समोरासमोर आणायचे होते. त्यासाठी ती परवानगी देखील मागितली होती. ती मिळाल्यानंतर एजन्सीनं पिंकीला तपासणीसाठी बोलावून घेतलं होतं. यावेळी पिंकीनं सुकेशची मदत कशाप्रकारे केली हे एजन्सीला जाणून घ्यायचं होतं. सध्या चौकशी केल्यापासून पिंकी ही ईडीच्या ताब्यात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी त्यांची बराचकाळ चौकशी केली. त्यांना एकुण 50 प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्या प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT