actress malaika arora and dilip joshi takes the first shot of covid 19 vaccine shares experience 
मनोरंजन

जेठालालनं घेतली कोरोनाची लस, मलायकानं केला फोटो व्हायरल  

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट धोक्याची ठरताना दिसत आहे. त्याचा वाढता प्रादुर्भाव सर्वांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे राज्य शासनानं कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. बॉलीवूडमध्येही अनेक सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. त्यांनी स्वतला क्वॉरंनटाईन करुन घेतले आहे. आता तारक मेहता का उल्टा चष्माचा प्रमुख अभिनेता दिलीप जोशी आणि अभिनेत्री मलायका अरोरानं कोविडची लस घेतली आहे. त्यांनी लस घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या दोघांच्या चाहत्यांनी त्या फोटोला लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी चाहत्यांना कोरोना पासून सावधान राहण्यासाठी काळजी घेण्यास सांगितले आहे.

जेठालालनं आणि मलायकानं सोशल मीडियावर पोस्ट लिहून नागरिकांना कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मलायकानं मुंबईतील लीलावती हॉस्पिटल्समध्ये कोरोनाची लस घेतली आहे. तिनं लिहिलं आहे, मी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. आपणही ती लस लवकरात लवकर घ्यावी. त्यासाठी उशीर करु नये. कोरोनात युध्दपातळीवर लढणा-या डॉक्टरांना मानाचा सलाम असंही मलायकानं सांगितलं आहे. दिलीप जोशीनंही सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्यानं लिहिलं आहे, सर्वांसोबत मजा येते. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनीही कोरोनाची लस घेतली आहे. जर आपण कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र असाल तर तातडीनं ती लस घ्या. त्यासाठी उशीर करु नका.

जोशीनं लसीकरण करणा-या रुग्णालयाचे आभारही मानले आहेत. काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनीही कोरोनाची लस घेतली होती. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये ही माहिती दिली होती. त्यांच्याशिवाय अभिषेक बच्चन यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. बिग बी यांनी लिहिलं आहे, लस घेतली आहे. आता सर्वजण ठीक आहे. कुटूंबातील सर्व सदस्यांनी कोविडची चाचणी करुन घेतली होती. त्यात ते पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आता सर्वांनी लस घेतली आहे.

 यापूर्वी सलमान खान, संजय दत्त, शर्मिला टागोर, धर्मेंद्र, हेमा मालिनी, मोहनलाल जितेंद्र, कमल हसन, नागार्जुन, रोहित शेट्टी, नीना गुप्ता, राकेश रोशन आणि जॉनी लिव्हर यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. या सर्वांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Paradh News : दोन बांगलादेशीची स्वदेशात रवानगी; पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा नोंद

Latest Marathi News Live Update : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे शिवसेना प्रचार करण्यातून रडत पडले बाहेर

Winter Pregnancy Care: हिवाळ्यात गर्भातलं बाळही थंडी अनुभवतं! आई आणि बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Virat Kohli नवीन वर्षातही खेळणार विजय हजारे ट्रॉफीतील सामना, पण कधी आणि कोणाविरुद्ध? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT