actress mayuri deshmukh shared post about women quote after husband ashutosh bhakre suicide
actress mayuri deshmukh shared post about women quote after husband ashutosh bhakre suicide sakal
मनोरंजन

Mayuri Deshmukh: तिला तुम्ही घाणीत टाकलं तरी.. पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची पोस्ट चर्चेत

नीलेश अडसूळ

Mayuri Deshmukh: मराठी टेलिव्हीजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख. मयूरीने आजवर अनेक मालिका आणि नाटकातून आपली मनं जिंकली. तिने 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले आणि काही काळातच तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले.

त्यानंतर 'डिअर आजो', 'तिसरे बादशाह हम' सारख्या व्यावसायिक नाटकातून ती झळकली आणि आता तर हिंदी मालिकांमध्येही मयूरी देशमुख हा आवडीचा आणि हवाहवासा चेहरा बनला आहे.

काही वर्षांपूर्वी मयूरीवर मोठा आघात झाला. तिच्या लग्नाला काही वर्ष उलटलेले असतानाच तिच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर बराच काळ मयूरीने स्वतःला सावरण्यासाठी घेतला. अद्यापही ती त्या धक्क्यातून बाहेर आली नसली तरी तिने कामाला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने ती आपले अनेक अपडेट सोशल मीडियावर देत असते. आज मात्र तिच्या पोस्टने सर्वांचेच डोळे उघडले आहेत.

(actress mayuri deshmukh shared post about women quote after husband ashutosh bhakre suicide)

मयुरीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये मयूरी म्हणते, 'कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:ला सावरणाऱ्या महिलेपेक्षा भीषण काहीही असू शकत नाही. एखाद्याने तिला घाणीत जरी टाकले तरी ती त्या घाणीतूनही वर येऊन उभी राहते. त्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टी तिला घाबरवू शकत नाहीत. ती तुमच्या अपमानाशीही कायमच जुळवून घेते. त्यामुळे सावध राहा,' अशा शब्दात मयूरीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मयूरीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला सहमती दिली आहे. तर काहींनी तीचं कौतुक करत तिला धीर दिला आहे. मयुरी देशमुखने ज्या पद्धतीने स्वतःला आणि कुटुंबाला सावरलं आहे त्यासाठी तीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT