actress model nia sharma gave all her make up tools to child video viral on social media  
मनोरंजन

व्हिडिओ व्हायरल; नियानं मेकअप कीट चिमुरडीला दिलं, लिपस्टिकही लावली

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कलाकार आणि त्याचं आपल्या चाहत्यांना देणं याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा कलाकार चाहत्यांना महागडया वस्तु देत असल्याचे दिसून आले आहे. केवळ चाहतेच आवडत्या सेलिब्रेटीला गिफ्ट देत नाही. तर कलाकारही त्यांना गिफ्ट देत असल्याचे एका प्रसंगावरुन पाहवयास मिळाले आहे. अभिनेत्री आणि मॉडेल निया शर्माचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. निया ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती अनेकदा तिच्या वागण्यामुळे चर्चेतही आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती मध्यरात्री एका गाडीसमोर नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आता निया चर्चेत आली आहे याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिनं आपल्या एका चाहतीला खुश केले आहे. एक चिमुरडी तिची फॅन असून तिला नियानं गिफ्ट दिलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नियाच्या चाहत्यांनी त्या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंटसही दिल्या आहेत. त्याचं झालं असं की नियानं तिला भेटायला आलेल्या एका लहान मुलीला तिचा मेकअपचा बॉक्सच भेट दिला आहे. त्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी नियाचं कौतूकही केलं आहे. तिच्या व्हिडिओला लाईक करुन कमेंटही केली आहे.

नागिन मालिकेची अभिनेत्री म्हणून नियानं आपला एक खास चाहतावर्ग तयार केला आहे. त्यामुळे ती नेहमीच लाईमलाईटमध्ये राहणारी अभिनेत्री आहे. सध्या जो एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात एक मुलगी नियाच्या मेक अप रुममध्ये येते. आणि नियाचा मेक अप बॉक्स ती पाहू लागते. ही गोष्ट जेव्हा नियाच्या लक्षात येते तेव्हा ती तिला आपला मेक अप बॉक्स देऊन टाकते. असे त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. एवढेच नाही तर निया त्या लहान मुलीला लिपस्टिकही लावते. त्यानंतर ती लहान मुलगी स्वतला आरशात निरखून पाहते तेव्हा तिला कमालीचा आनंद होतो.

निया नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. नियानं आताचा जो व्हिडिओ शेअर केला आहे त्याला काही तासांतच चार लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.  नियाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती जमाई राजा 2.0 मध्ये दिसणार आहे. त्याचा प्रीमिअर हा 26 फेब्रुवारीला झाला होता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT