actress mugdha godbole shared video of satvya mulichi satavi mulagi serial murder scene how rupali kills mamata sakal
मनोरंजन

खून आहे की मस्करी.. तब्बल सातवेळा फेकलं..'सातव्या मुलीची' मालिकेतील तो व्हिडिओ होतोय व्हायरल..

अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने शेयर केलेला व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

नीलेश अडसूळ

satvya mulichi satavi mulagi: सध्या झी मराठी वरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका चांगलीच चर्चेत आहे. दिवसेंदिवस गूढ उलगडत जाणारी ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेत रूपालीने ममताचा खून करून तिची जागा आणि तिची संपत्ती बळकावलेली असते, त्याचं गूढ आता हळू हळू उलगडत आहे.

या मालिकेत रूपालीच्या म्हणजे खालनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आहे तर ममता ही भूमिका लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले साकारत आहे. याच मालिकेतील एक खास सिन चित्रित होत असतानाचा व्हिडिओ मुग्धाने सोशल मीडियावर शेयर केला आहे.

या मालिकेत रूपाली ममताला टेरिस वरून ढकळून देते आणि तिचा खून करते असे दाखवण्यात आले आहे. पण हा सिन नेमका कसा शूट झाला हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

मुग्धाने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, या सिन मध्ये ममताला म्हणजेच मुग्धाला टेरिसवरून ढकळून देण्यात येते. म्हणूनच या सिनसाठी मुग्धा सारखा एक पुतळा तयार करण्यात आला होता. जो रूपाली टेरिस वरून ढकलते. तर याचे विविध अँगलने शूट करण्यासाठी मुग्धा टेरिस याऐवजी एका छोट्या टेबल वरून उडी मारताना दिसत आहे. हा भन्नाट व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

Mahajyoti Skill Scam: महाज्योती बनली भ्रष्टाचाराचा अड्डा; महाज्योतीमध्ये ३०० कोटींचा 'कौशल्य विकास' घोटाळा?

SCROLL FOR NEXT