Actress neena gupta
Actress neena gupta  team esakal
मनोरंजन

छोटे कपडे घालून गुलजारांना भेटायला गेलेल्या नीना गुप्ता ट्रोल

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta) यांच्या 'सच कहूं तो' (sach to kahoo) या आत्मचरित्राची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. नीना या आपल्या आत्मचरित्रातील वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर शेयर करताना दिसत आहे. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीतील काही सेलिब्रेटींची भेट घेतली आहे. आणि त्यांना आपल्या आत्मचरित्राची प्रत भेट दिली आहे. यावेळी त्यांनी प्रख्यात गीतकार गुलजार यांना आपल्या आत्मचरित्राची भेट दिली आहे. तेव्हाचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलीवूडची बेबो अर्थात करिना कपूरनं नीना गुप्ता यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन केले होते. त्या पुस्तकातील काही किस्से सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नीना यांनी लोकप्रिय गीतकार गुलजार यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांना आपल्या पुस्तकाची भेट दिली आहे. जेव्हा त्यांनी ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तेव्हा काहींनी ट्रोल केले आहे. तिच्या कपड्यांवरुन नीना यांच्यावर टीका करण्यात आली आहे. काहींनी त्यांना क्युटही म्हटले आहे.

मी गुलजार यांची भेट घेतली आहे. आणि त्यांना माझे पुस्तक भेट दिले आहे. आता मला थोडी भीती वाटायला लागली आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांना ते पुस्तक कसे वाटेल. मला आशा आहे की, ते माझं पुस्तक वाचतील आणि मला त्यावरुन रिप्लाय देतील. नीना यांनी गुलजार यांना विचारलंय की, तुम्ही हे पुस्तक वाचणार आहात ना, मला वाचल्यावर जरुर सांगा. याशिवाय त्यांच्या तब्येतीची तिनं विचारपूस केली आहे.

दुसरीकडे अनेकांनी नीना यांना ट्रोल केले आहे. गुलजार यांच्याकडे गेला होतात तर साडी घालून जायला हवे होते. त्याचं कारण म्हणजे गुलजार साहेबांची गोष्ट वेगळी आहे. ते मोठे गीतकार आहेत. त्यांची भेट घेताना तुम्ही वेशभूषा बदलायला हवी होती. असं त्यांना त्या ट्रोलर्सनं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नीना यांचे सच कहू तो नावाचे आत्मचरित्र बॉलीवूडमध्ये वादाचा विषय़ ठरताना दिसत आहे. त्यात नीना यांनी अनेकांची पोलखोलही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT