मनोरंजन

माझ्यापेक्षा नवरा चांगला कूक अभिनेत्री नूपुर सांगतेय...

खाण्याबद्दल जेव्हा मी विचार केला, तेव्हा खूप वेगवेगळ्या गोष्टी आठवल्या.

सकाळ डिजिटल टीम

खाण्याबद्दल जेव्हा मी विचार केला, तेव्हा खूप वेगवेगळ्या गोष्टी आठवल्या. मला वाटत होतं की मी फुडी नाहीये, मला फारशी खाण्याची आवड नाहीये, पण मी म्हणेल की मी फुडी नसली तरी चुझी आहे. मला ठराविक अशाच गोष्टी आवडतात. ब्रेडशी रिलेटेड कुठलेही पदार्थ मी अगदी आवडीने खाऊ शकते. भाताचे वेगवेगळे प्रकार, जसे मसालेभात आणि फ्राइड राइस मला आवडतो.

मी अभिनय अन् नृत्य क्षेत्रात असल्याने मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची संधी मिळते. भारत व भारताबाहेरही मी अनेकदा गेले व तिथले मोजकेच पदार्थ मी आवडीने खाल्ले. मी शुद्ध शाकाहारी आहे. तरीही माझे खाण्याचे हाल झाले नाही. मी वेगवेगळ्या आयलंडवर गेले, फुफेट्स, मालदिव, बाली येथे गेले. पण, तेथे खाण्याचा प्रश्न आला नाही. पुण्यात वैशालीच्या सांबरासारखी चव साऊथमध्येही आली नाही. पूना बेकरीचे पॅटिस, गणेश भेळ, चाट, पाणीपुरी, अप्सराचे पेरू आइस्क्रीम आवडते. लंडनला गेले होते, तेव्हा ‘वाघामामा’मध्ये जाऊन तेथील जॅपनीज रेस्टॉरंटमधील कच्चू करी खायला सांगितली. दुसऱ्यांदाही मी तेथे गेले अन पुन्हा आस्वाद घेतला. लंडनमधील ‘व्हिएतनाम इन्स’मधील पदार्थ खूप आवडले. कॅनडामधील कॉफी आवडली. यूएसमधील ‘क्रीम वर्ल्ड’मध्ये योगटमध्ये वेगवेगळे आवडते पदार्थ घालून देतात, ते खूप आवडले.

मला मूड आला की मी स्वयंपाक करते. पण, पोळीभाजी व वरणभाताऐवजी मी वेगळे काहीतरी बनविते. माझा भाऊ निनाद याला माझ्या हातचा पास्ता किंवा मेक्सिकन राइस आवडतो, तो मी बनविते. माझा नवरा सौरभ उत्तम कुक असून तो माझ्यापेक्षा चांगलं जेवण बनवितो. एकदा माझ्याकडून डाळ मखनीचा पदार्थ बिघडला. आईच्या हातची मिसळ खूप आवडते. मी पण बनवायची ट्राय करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT