Pooja Katurde Google
मनोरंजन

काय आहे 'रविवार डायरीज'; पुजा कातुर्डेच्या नावाची रंगली चर्चा...

चैतन्य सरदेशपांडे लिखीत -दिग्दर्शीत 'रविवार डायरीज' या नाटकात पूजा आणि तिच्या मित्रांनी मिळून हा नाट्यानुभव आणला आहे.

प्रणाली मोरे

अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री पूजा कातुर्डे(Pooja Katurde) वेगळा नाट्यानुभव देणार आहे. चैतन्य सरदेशपांडे लिखीत -दिग्दर्शीत 'रविवार डायरीज' या नाटकात पूजा दिसून येणार आहे. पूजा आणि तिच्या मित्रांनी मिळून हा नाट्यानुभव आणला आहे. पूजा या नाटकाबद्दल सांगते, 'रविवार डायरीज'(Ravivar Dairies) हा वेगळा प्रयोग आम्ही केला आहे. आपण सोमवार ते शुक्रवार आपलं काम करतो आणि वीकेण्डला पार्टी करतो. प्रत्येक जण संपूर्ण आठवडा रविवार कधी येतो हे पाहात असतो. आपण सगळ्याच प्रकारे एका चक्रात अडकलो असतो. त्यावरच रविवार डायरीज हे नाटक आहे.”(Actress Pooja Katurde's 'Ravivar Dairies',Read details)

एका माणसाला शर्ट घ्यायचा असतो, त्यासाठी तो मॉलमध्ये जातो. मनासारखा शर्ट शोधण्यासाठी तो बराच प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो फक्त शर्ट नसतो तर अपेक्षा आणि स्वप्न असतात. त्यासाठी तो मॉलमध्ये रात्र घालवतो. त्यातून त्याला काय मिळतं हे दाखवणारा हा नाट्यानुभव आहे. हे ठराविक साच्यातील नाटक न करता नाट्यवाचन, नाट्यानुभव असा हा वेगळा प्रयोग आहे.“हे नाटक प्रत्येकाला आपलंसं वाटणारं आणि प्रत्येक जण यातून काहीतरी घेऊन जाणारं आहे”,असं पूजा सांगते.

या नाटकाचं लेखन दिग्दर्शन चैतन्य सरदेशपांडेनी केलं आहे. तर पूजा सोबत यात अभिनेत्री दीप्ती लेलेही आहे. शुक्रवारी याचा पहिला प्रयोग अंधेरीत होणार आहे. त्या शिवाय पुणे, नाशिक,धुळे इथेही नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

पूजा कातुर्डेने आत्तापर्यंत अहिल्या बाई होळकर, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली, बाकरवडी, सांग तू आहेस का? अशा मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT