actress prajakta mali fans angry reaction on kushal badrike's ranbazar post  sakal
मनोरंजन

प्राजक्ता माळीच्या फॅन्सने घेतला कुशल बद्रिकेचा समाचार.. एक चूक पडली महागात

रानबाजार पाहून कुशाने सगळ्यांचं कौतुक केलं, पण प्राजक्ताला विसरला आणि मग जे काही झालं.

नीलेश अडसूळ

prajakta mali : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची रानबाजार या वेबसिरीजची चर्चा अधिक रंगली आहे. वेब सीरिजच्या पहिल्या टीजरपासून यामध्ये बोल्ड दृश्य दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची विशेष चर्चा रंगली होती. या वेब सिरिज मध्ये प्राजक्ताने एका वेश्येची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तीला प्रचंड मेहनत करावी लागली. प्राजक्ताच्या स्वभावाच्या पूर्णतः विरुद्ध अशी ही भूमिका होती. त्यामुळे तिने या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी अनेक सायास केले आहेत. पण इतकी महत्वाची भूमिका असतानाही तिच्या या भूमिकेकडे अभिनेता कुशल बद्रिकेने चक्क दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे त्याची ही चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे. (actress prajakta mali fans angry reaction on kushal badrike's ranbazar post)

अभिनेता कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) रानबाजार वेबसिरिज पाहून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कुशलने सर्वांचे कौतुक केले पण प्राजक्ता माळीला मात्र बगल दिली आहे. कुशलने आपल्या पोस्टमध्ये प्राजक्तासाठी एकही शब्द लिहिलेला नाहीय. शिवाय तिला टॅगही केलेलं नाहीय. त्याची ही चूक प्राजक्ताच्या चाहत्यांनी अचूक हेरली आहे.

'Web series ची Typical गणितं मोडत, समाजाच आणि राजकारणाच वास्तव चित्र दाखवणारी ही Series “कथेच्या नायकातल, अती-सामान्यपण, आणि सामान्य माणसातला नायक अधोरेखीत करत रहाते”.“System नावाची एक निर्जीव गोष्ट आपल्यातला जिवंतपणा संपवून टाकते” हेच खर.अभिजीत पानसे , तेजस्विनी पंडीत, मोहन आगाशे सर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी काका, अनंत जोग सर, माधुरी पवार ह्यांचा भाराऊन टाकणारा Performance ह्या Series चा आत्मा ठरतो.Personally मला ही Web series खुप आवडली नक्की बघा “रान बाजार”On Planet Marathiआणि जाता जाता….. “ते कुंडी लगालो सय्यां” गाण काहीच्या काही केलय'' अशी पोस्ट कुशलने केली आहे.

यामध्ये प्राजक्ताविषयी एकही अक्षर लिहिलेले नाही. यावर प्राजक्ताच्या चाहत्यांनी नजरी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ता कुठे आहे, प्राजक्ताचा अभिनय तुला आवडला नाही का, प्राजक्ताचा उल्लेख व्हायला हवा. कारण तिने कामही तितकं दर्जेदार केलंय अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. अखेर याची दखल स्वतः कुशलने घेतली असून प्राजक्ताची माफी मागितली आहे. माझ्याकडून हे चुकून झालं, असंही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

Vastu Shastra: आठवड्याच्या 'या' दिवसांत पैशाचे व्यवहार करू नका, वास्तुशास्त्रात सांगितले महत्त्वाचे नियम

Horoscope : 2026 वर्ष सुरू होताच बनतोय लक्ष्मी-कुबेर धनलाभ योग; 6 राशींच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, अडकलेली कामे होणार पूर्ण

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंना पश्चाताप होईल, असे जागावाटप, उदय सामंतांची टीका

SCROLL FOR NEXT