Actress prajakta mali shared memories of her breakup sakal
मनोरंजन

प्राजक्ता माळीचं झालं ब्रेकअप.. म्हणाली, मला तेव्हाचं काहीही..

एका मुलाखती दरम्यान प्राजक्ताने आपल्या ब्रेकअप बाबत मोठा खुलासा केला आहे.

नीलेश अडसूळ

prajakta mali : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. नुकतीच आलेली 'रानबाजार' वेब सिरिज आणि येऊ घातलेला 'वाय' सिनेमा यामुळे सर्वत्र प्राजक्ताची हवा आहे. रानबाजार या वेब सिरिज मध्ये प्राजक्ताने एका वेश्येची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तीला प्रचंड मेहनत करावी लागली. तितकेच तिच्या भूमिकेचे कौतुकही झाले. तर आता 'वाय' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्राजक्ताने कंबर कसली आहे. या चित्रपटातही तिने अत्यंत वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटानिमित्त प्राजक्ता विविध माध्यमांना भेटी देत आहे. अशाच एका भेटीत प्राजक्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Actress prajakta mali shared memories of her breakup) (prajakta mali breckup)

‘वाय’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान प्राजक्ताचा ब्रेकअप झाला होता, असे तिने या मुलाखतीत सांगितले. प्राजक्ता म्हणाली, ' या चित्रपटात माझी भूमिका अंत्यत छोटी आहे. पण ती तितकीच महत्त्वपूर्णही आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप गोष्टी होत होत्या. त्यावेळी माझं ब्रेकअप झालं होतं. मी कुठे आहे, माझं काय सुरु आहे, याची मला काहीही कल्पना नव्हती. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानच्या अनेक गोष्टी मला नीट आठवतही नाहीत.'

पुढे ती म्हणाली, 'आम्ही जेव्हा हा चित्रपट पाहात होतो, तेव्हा मला चित्रपटाचे दिग्दर्शक आठवण करुन देत होते की तू हा सीन करताना पडली होती. तू हा सीन करताना हे असं असं बोलली होतीस, तुला आठवतंय का? त्यांनी मला हे प्रश्न विचारल्यावर मी फक्त हो इतकच उत्तर देत होती. पण मला त्यावेळी काय झालं होतं हे अजिबात आठवत नाही. त्यावेळी मी माझ्याच विचारात गुंतलेली होते.' अशी आठवण प्राजक्ताने सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT