actress Priyanka chopra reveal in memoir unfinished she hid her boyfriend in closet and aunt complained to her mother 
मनोरंजन

'मावशी अचानक आली, बॉयफ्रेंडला कपाटात ठेवलं लपवून'  

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  प्रियांकाला आता बॉलीवूडची नव्हे तर हॉलीवूडची अभिनेत्री झाली आहे. तिनं परदेशी वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच तिचा व्हाईट टायगर नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट लोकप्रिय झाला होता. प्रियंका सध्या अनफिनिश्ड या तिच्या आत्मचरित्रासाठी चर्चेत आली आहे. त्यात तिनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यापैकी एक तिच्या बॉयफ्रेंडचा आहे.

आपल्या आत्मचरित्रामध्ये प्रियांकानं वेगवेगळ्या गोष्टी वाचकांसमोर मांडल्या आहेत. तिनं याविषयी सांगितले की, मला माझ्या बॉयफ्रेंडला एकदा कपाटात लपवावे लागले होते. त्याचे कारण म्हणजे आम्हा दोघांना मावशीनं रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे घाबरलेल्या प्रियंकाला बॉयफ्रेंडला कपाटात लपवावे लागले होते. टीनएजर असणा-या त्या दोघांसाठी ही मोठी गोष्ट होती. मंगळवारी प्रियंकाचं आत्मचरित्र अनफिनिश्ड प्रकाशित झालं. त्यात तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. प्रियंकानं आपल्या टीनएजमधील काही वर्षे ही अमेरिकेत घालवली होती. त्यावेळी ती तिच्या जवळच्या एका नातेवाईकांकडे राहत होती. तिथल्याच शाळेत होती.

अमेरिकेत असताना प्रियंका ही बॉब नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. एका मुलाखतीत प्रियंकानं सांगितले की, तेव्हा मी भलत्याच अडचणीच सापडले होते. जेव्हा मी 10 वीत होते तेव्हा किरण नावाच्या माझ्या मावशीसोबत राहत होते. ती इंडियानापालिसमध्ये राहत होती. तिथे प्रियंका बॉबला भेटली होती. बॉबच्या गंमतीदार स्वभावामुळे ती त्याच्या प्रेमात पडली. दोघांनी त्यावेळी लग्न करण्याचेही प्लॅनिंग केले होते. एकदा मी बॉब सोबत टीव्ही पाहत होते. तेव्हा नेमकी मावशी घरी आली. ती तिच्या घरी येण्याची वेळ नव्हती. मात्र ती अचानक आल्यानं मी गोंधळून गेले. अशावेळी काय करावे कळेना. तोपर्यत मावशीला संशय आला होता. मी बॉबला कपाटात लपवून ठेवले होते. मावशीनं मला कपाट उघडायला सांगितले होते. तिनं हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आईकडे माझी तक्रार केली होती.

प्रियंका तिच्या नव्या चित्रपटावरुनही सध्या चर्चेत आहे. अरविंद आडिगा यांच्या द व्हाईट टायगर कादंबरीवर त्याच नावानं चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. काही कारणास्तव तो वादाच्या भोव-यातही सापडला होता. तो वाद न्यायालयात गेला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT