Actress Rajshree Deshpande film got Emmy Awards  
मनोरंजन

सॅक्रेड गेम्समधील 'या' अभिनेत्रीच्या चित्रपटाला मिळाला 'एमी अॅवॉर्ड्स 2019!'

वृत्तसंस्था

अष्टपैलू अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती राजश्री देशपांडे तिच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या समीक्षकांनी सन्मानित व पुरस्कारप्राप्त ब्रिटिश गुन्हेगारीवर आधारित मॅकमाफिया ड्रामानंतर सर्वत्र झळकत आहे. मॅकमाफियाने जिंकलेल्या 'एमी अवॉर्ड्स 2019' बद्दल व्यक्त होत राजश्री म्हणते की, "मला अभिमान आहे. मॅकमाफिया बरोबरचं सेक्रेड गेम्सचे देखील त्याच श्रेणीमध्ये नामांकन झाले होते. आपण काम करत असलेल्या भारतीय कलाकृतीला नामांकन मिळत आहे याचा मला खूप आनंद आहे!" आंतरराष्ट्रीय फीचर्स आणि कार्यक्रमांशी तुलना न करत भारत दिवसेंदिवस चांगल्या सामग्रीची निर्मिती करीत असल्याचे मत राजश्री देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

राजश्रीने तिच्या नभांगण फाउंडेशनच्या वतीने, दुष्काळग्रस्त औरंगाबाद जिल्ह्यातील दोन गावे दत्तक घेतली असून तिथे तिने जलसंधारण कार्यक्रम आणि शाळा बांधण्यासह अनेक सामुदायिक प्रकल्प हाती घेतले आहेत. याचसंदर्भात द वॉटर मॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग, यांच्याकडून पाण्याची साठवण करण्याच्या छोट्या-छोट्या पद्धती समजून घेण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी सेवाग्राम आश्रम येथे जावे लागल्यामुळे ती यावर्षीच्या 'एमी अवॉर्ड्स 2019' साठी राजश्री उपस्थित राहू शकली नाही. 

एमीच्या विजयाचा उत्सव गमावलेल्या, राजश्रीने हा उत्सव आपला सहकलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी समवेत मुंबईत साजरा करण्याची आशा व्यक्त केलेली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारले असता, ती सांगते की, जेव्हा-जेव्हा मी नवाज बरोबर काम करते तेव्हा प्रत्येकवेळी मला वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करत असल्याचा भास होतो. तो आश्चर्यकारक आहे!  मंटो मध्ये मी त्याच्या जवळच्या मैत्रिणीची 'इस्मत चुगताई' ची, सेक्रेड गेम्समध्ये त्याच्या पत्नीची 'सुभद्रा' ची तर मॅकमाफिया मध्ये त्याच्या मैत्रीणीची मंजूची भूमिका साकारली आहे. आता तर मला 'लेडी नवाज' असल्यासारखे वाटते" पुढे ती सांगते की, "आम्ही दोघही खूप मेहनत करून शून्यातून वर आलेले आहोत. नवाजने त्याच्या क्षेत्रात त्याची श्रेष्ठतेची उंची गाठलेली आहे आणि आशा करते की, मी देखील ती लवकरच गाठेन." छोट्या गावातून येऊन, वित्त व जीवनाचे व्यवस्थापन करीत, या क्षेत्रात स्वतःची जागा शोधत, स्वतःचे योग्य स्थान निर्माण करत, आता एमी पर्यंतच्या संपूर्ण यशस्वी संघर्षाची राजश्री देशपांडे कृतज्ञ आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स वॉटकिन्सबरोबर काम करताना, ती त्यांच्या संयम, नम्रतेचा आणि आदरयुक्त स्वभावाबद्दल ठासून सांगते. "ते अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहे! माझ्या कामाबद्दल त्यांना आधीपासूनच सर्व माहिती होते. त्यांनी सेटवर मला खूप छान वागणूक दिली. आम्हाला कम्फर्टेबल वाटण्यासाठी आम्ही शूटिंग सुरू करण्यापूर्वी ते स्वतः आमच्यासोबत एक तास घालवत. इतकेच नव्हे तर त्यांनी मला मंजू हे पात्र सुंदरप्रकारे सकरल्याबद्दल आभार व्यक्त करणार एक हस्तलिखित पत्रही पाठवले."  राजश्रीचा असा विश्वास आहे की प्रत्येकजण नम्र आणि समान असणे हा गुण दिग्दर्शकासाठी खूप महत्वाचा असतो.

राजश्री देशपांडेला असा विश्वास आहे की पुरस्कार आणि प्रशंसापत्रे कामाची ओळख सक्षम करतात. याबद्दल सांगताना ती म्हणते की, “माझी ओळख मला महाराष्ट्रातील खोलवर रुजलेल्या प्रश्नांवर कार्य करण्यासाठी अधिकाधिक सामर्थ्य देते. जर आपण सातत्याने कठोर परिश्रम केले तर सर्वकाही परिपूर्ण आहे आणि तुम्हाला त्याचे यश मिळतेच.”

राजश्रीला तिच्या कारकीर्दीत करण्यासारखे अजून खूप काही बाकी आहे. तिला आता फक्त ह्या प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT