actress rakhi sawant is singing and dancing in goa club video viral.jpg 
मनोरंजन

गोव्याच्या क्लबमध्ये राखीने केली धम्माल; पहा VIDEO

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडमध्ये कॉन्ट्रवर्सि क्विन म्हणून ओळखली जाणारी आभिनेत्री म्हणजे राखी सावंत. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला नेहमी ट्रोल केले जाते. नुकताच झालेल्या 'बिग बॉसच्या 15'मध्ये राखी टॉप 5 स्पर्धकांपैकी एक होती. बिग बॉसमधील राखीने धमाल मस्ती करून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. राखीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती गोव्यामध्ये धमाल मस्ती करताना दिसत आहे.

राखी सध्या गोव्यामध्ये हॉलिडे वेकेशनसाठी गेली आहे. तिने तेथील एका क्लबमधील व्हिडिओ शेअर केला. या क्लबमध्ये राखीने तिच्या प्रसिध्द आयटम सॉंग 'परदेसीया' वर  भन्नाट डान्स केला. तसेच 'बिग बॉस १४' मधील मीम सॉंग 'क्या ये सांडनी थी' या गाण्यावर देखील तिने परफॉर्म केले. या व्हिडिओला राखीने कॅप्शन दिले, 'गोव्यात मज्जा करत आहे. देवाचे धन्यवाद.' त्या क्लबमध्ये राखीला तिचे अनेक चाहते भेटले. राखीने त्याच्यासोबत धमाल केली. 

बिग बॉसमुळे राखीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा शो संपल्यानंतर देखील राखी कोणत्या कोणत्या कारणावरून सतत चर्चेत राहते. आता राखी क्लबमधील व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. राखीचा क्लबमधील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. राखीने नुकतेच एका शुटिंग संपवले आहे. या वेब सिरीजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'बिग बॉसच्या 15' मध्ये राखी फाईनलिस्ट होती. पण फिनाले एपिसोडमध्ये ती बक्षिसातील काही रक्कम घेऊन बाहेर पडली. बिग बॉसमध्ये राखीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. 'तवायफ-बजार ए हुस्न' या नव्या वेब सिरीजमधील राखीचा अभिनय पहाण्यासाठी  प्रेक्षक उत्सुक आहेत. या नव्या प्रोजेक्टसाठी राखीला नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Latest Marathi News Live Update : पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का; माजी नगरसेवक विशाल तांबे यांचा राजकारणातून संन्यास

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

१०० कोटींचा सिनेमा, अभिनयात दिली जिनिलियाला टक्कर, आता 'वेड' फेम अभिनेत्रीला मिळत नाहीये काम, म्हणते- दुसरा पर्याय...

SCROLL FOR NEXT