rasika duggal share video releted mizapur king politics  
मनोरंजन

‘ जो बचेगा वो ही गद्दी पे बैठेगा ‘; रसिका दुग्गलनं सांगितलं मिर्झापूरचं ‘पॉलिटिक्स’ 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मिर्झापूरचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. अनेकांनी रात्रभर जागून ही सीरिज पाहिली होती. या मालिकेचा पहिला भागही रसिकांच्या पसंतीस उतरला होती. त्यामुळे दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना होती. ती प्रदर्शित झाल्यानंतर या मालिकेनं टॉपचं रेटिंगही मिळाली.

सरतेशेवटी मिर्झापूरच्या गादीवर कोण बसणार यावर निर्णय झालेला नाही. त्याविषयी मालिकेतील अभिनेत्री रसिका दुग्गल हिनं एका मुलाखतीतून नवीन माहिती सांगितली आहे. हिंदीत प्रदर्शित झालेली मिर्झापूर ही आता तमिळ आणि तेलगु भाषेतही प्रदर्शित झाली आहे. रसिकानं मिर्झापूरनं कालीन भैय्याच्या पत्नीची भूमिका केली होती. ती प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. मिर्झापूरच्या सत्तेवर कुणाचा अंकुश राहणार यात महत्वाची भूमिकाही रसिकानं वठवली आहे. रसिकानं इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर माहिती शेयर केली आहे.

रसिका म्हणाली, मिर्झापूरचं राजकारण दिसते तसे नाही. त्यात वेगवेगळे बदल आहेत. ते बारकाईनं समजून घ्यायला हवे. तिनं जो एक व्हिडिओ शेयर केला आहे त्या व्हिडिओ मध्ये ती त्रिपाठी परिवारातील नोकर राजाला सांगते की, कालीन भैय्याची दोनच मुलं आहेत. मात्र मिर्झापूरची गादी तर एकच आहे. त्यामुळे जो वाचेल तोच या गादिवर बसेल असे तिनं म्हटलं आहे.  याबरोबरच तिनं असं लिहिलं आहे की,  हे लक्षात घेतलं म्हणजे मिर्झापूरचे पॉलिटिक्स लक्षात येईल. आता तमिळ, तेलगु भाषेतील प्रदर्शित होणा-या या मालिकेत मिर्झापूरची गादी ही केवळ एकासाठीच असल्याचे लक्षात घ्यायला हवे.

मिर्झापूरच्या मालिकेनं रसिकाला एक वेगळी ओळख दिली आहे. त्यात तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. याशिवाय आणखी काही मालिका आणि चित्रपट यामुळेही ती सर्वांच्या आवडीची अभिनेत्री झाली आहे. मेड इन हेव्हन, अ सुटेबल बॉय सारख्या मालिकेतही तिची भूमिका लक्षवेधी झाली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT