actress richa chadha shares aishwarya rai salman khan film song lutt gaye to express agony on fuel price  
मनोरंजन

'गाडीत पेट्रोल फुल्ल केलं, हम तो लुट गए' रिचाची पोस्ट व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. प्रतिलीटर शंभर रुपयांचा दर झाल्यानं सर्वसामान्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढत असल्यानं अनेकांचा संताप झाला आहे. सत्ताधा-यांचा निषेध केला जात आहे. त्यावर बॉलीवूडच्या सेलिब्रेटीनींही सोशल मीडियावर त्याविषयी लिहिले आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाची एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रिचानं पेट्रोल दरवाढीवर सडकून टीका केली आहे. तिनं ज्यापध्दतीनं टीका केली आहे त्यावरुन नेटक-यांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी रिचा ओळखली जाते. वेगवेगळ्या मुद्दयांवर कुठलीही भीडभाड न ठेवता ती आपली भूमिका मांडत असते. तिनं आता सोशल मीडियावर पेट्रोल दरवाढीवर केलेली टिप्पणी सत्ताधा-यांच्या जिव्हारी लागणार असल्याची प्रतिक्रिया रिचाच्या चाहत्यांनी दिली आहे. रिचानं लिहिलं आहे की, आताच गाडीची टाकी फुल केली आहे, लुट गए असे म्हणून तिनं सलमान आणि ऐश्वर्याच्या हम दिल दे चूके सनम च्या चित्रपटातील हम लुट गए चित्रपटातील गाणं शेअर केलं आहे.

रिचा चढ्ढानं सोशल मीडियावर युझर्सनं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पेट्रोलच्या दरवाढीवर रिचानं केलेल्या व्हिडिओबद्दल तिला धन्यवादही दिले आहेत. सध्या दिल्लीत पेट्रोल 90.93 रुपये दर आहे. तर डिझेल 81.32 रुपये आहे. तर मुंबईत 97.34 हा दर पेट्रोलचा आहे. तर डिझेलचा 88.44 एवढा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिचानं दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या बाजूनं भूमिका घेतली होती. त्याविषयी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितले होते की, शेतक-यांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारनं प्रयत्नशील राहायला हवं.

शेतकरी बिलाला विरोध करणं म्हणजे सरकारला विरोध करणं असे समजणे चूकीचे आहे. शेतक-यांचा मानवी दृष्टीकोनातून विचार का केला जात नाही हा खरा प्रश्न आहे.  रिचाचा लाहोर कॉन्फिडेंशियल नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच तिचा शकिला आणि मॅडम चीफ मिनिस्टर नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT