actress rinku rajguru birthday her fan bad experience after sairat marathi movie sakal
मनोरंजन

Rinku Rajguru Birthday: सैराट हीट झाला आणि 'ते' पोरगं रिंकूच्या मागं हात धुवून लागलं.. एकदा तर त्याने..

आपल्या आर्चीचा म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आज वाढदिवस..

नीलेश अडसूळ

Rinku Rajguru : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं (rinku rajguru) नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) या चित्रपटामध्ये रिंकू मुख्य भूमिकेत होती.

तिचा तो पहिला चित्रपट. या चित्रपटात तिने साकारलेली आर्ची ही भूमिका प्रचंड गाजली. या चित्रपटानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. तिने अनेक चित्रपट गाजवले. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे.

वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. अशा लोकप्रिय पण अत्यंत साध्या राहणाऱ्या अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने पाहूया, सैराट नंतर तिच्या आयुष्यात घडलेला एक भयानक किस्सा..

(actress rinku rajguru birthday her fan bad experience after sairat marathi movie)

रिंकूचा सैराट चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने प्रचंड कमाई केली. अगदी मराठी चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडून काढले. या चित्रपटानंतर तिला एवढी प्रसिद्धी मिळाली, की रिंकूला सुरक्षा द्यावी लागली होती. तिच्या घरच्या बाहेर, अक्षरशः रांगा लागायच्या.. पण एक फॅन असा होता की तो रिंकूसाठी डोक्याचा ताप झाला होता.

हा किस्सा रिंकूनेच एका मुलाखतीत सांगितला होता. रिंकू म्हणाली होती की, 'आपण अनेक कार्यक्रमांना जातो. चाहत्यांबरोबर हात मिळवतो. अशाच एका कार्यक्रमाला गेले असता मी एका चाहत्याला बघून सहज हात दाखवला.'

'माझ्या लक्षातही नव्हतं तो कोण होता. एके दिवशी अचानक तो घरी आला आणि माझ्या आई-बाबांना म्हणाला मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात बघितलं आहे. ती रुक्मिणीचा अवतार आहे. मागच्या जन्मी मीही देव होतो. तर या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या.'

पुढे ती म्हणाली, 'एवढंच नाही तर त्यानंतर तो अनेकदा माझ्या घरी यायचा. एकदा मी परिक्षेसाठी गेले होते. माझा पेपर संपल्यानंतर मी बाहेर आले. तेव्हा तो माझ्यासमोर पैशांची थैली घेऊन उभा होता. हे फारच भीतीदायक होतं. त्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप त्रास दिला. शेवटी आम्हाला पोलिसांत तक्रार करावी लागली.' असा भयानक अनुभव तिने यावेळी सांगितला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Expressway : शक्तिपीठ महामार्गावर मोठा ट्विस्ट; फडणवीसांनी जाहीर केली नवी अलायमेंट, सोलापूर, सांगली ते कोल्हापूर नवा मार्ग

Nashik Development : वृक्षतोड वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ६८९ कोटींच्या कामांचा प्रारंभ; विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न?

Latest Marathi News Live Update: निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ कामं मनसे कधीही सहन करणार नाही - राजेश चव्हाण

Video : अमेरिका पाकिस्तानला मदत का करते? माजी CIA एजंटकडून स्वत:च्याच सरकारची पोलखोल; देशाला हादरवणारी माहिती समोर...

Google ही नवी जादू! फक्त एक ओळ लिहा अन् App बनवा; Disco AI ब्राउजर करत आहे कमाल, पाहा कस वापरायचं

SCROLL FOR NEXT