actress rinku rajguru said about her boyfriend, education and english and personal life in bus bai bus show on zee marathi sakal
मनोरंजन

मराठी कळतंय, का इंग्रजीत सांगू.. म्हणणाऱ्या आर्चीला खरच इंग्रजी येतं का?

सैराट फेम आर्ची म्हणजेच रिकू राजगुरू हिच्या आयुष्यातील काही धमाल किस्से..

नीलेश अडसूळ

Rinku Rajguru : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं (rinku rajguru) नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे. वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या झुंड (jhund) आणि 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटांतून रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. पण आता रिंकू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. तिचा सैराट मधील एक डायलॉग आता तिला चांगलाच भारी पडणार आहे..

2016 मध्ये आलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा रिंकूचा पहिला चित्रपट. यामध्ये रिंकूने 'आर्ची' हे पात्र साकारले होते. या चित्रपट रिंकूने एका बड्या घरातील पण काहीशा रांगड्या मुलीची भूमिका साकारली होती. तिची ग्रामीण बोली, त्यातले ठेहराव, तिचे संवाद याची चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली होती. यामध्ये तिचा एक डायलॉग सर्वात गाजला तो म्हणजे, ' मराठीत सांगितल्यालं कळतय ना, का इंग्रजीत सांगू' .. या डायलॉगने अक्षरशः धुमाकूळ घातला पण चित्रपटामध्ये इतरांना 'मराठीत कळत नसेल तर इंग्रजीत सांगू का?' असं म्हणणाऱ्या रिंकूला खऱ्या आयुष्यात इंग्रजी येतं का? असा प्रश्न समोर आला आहे.

(actress rinku rajguru said about her boyfriend, education and english and personal life in bus bai bus show on zee marathi)

पण या प्रश्नाचं उत्तर लवकरच तुम्हाला मिळणार आहे. कारण झी मराठीवर 'बस बाई बस' ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत महिला कलाकार सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जाणार आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री रिंकू राजगुरू सहभागी होणार आहे, त्यामुळे तुमच्या मनातील अनेक प्रश्न तिला यावेळी विचारले जाणार आहे. नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला असून, बस मधील महिला रिंकूला तू कितवीत आहेस, तुझा बॉयफ्रेंड आहे का, तुला इंग्रजी येतं का, खऱ्या आयुष्यात कुणाला कानाखाली दिली आहेस का, असे प्रश्न विचारताना दिसत आहेत. येत्या 29 जुलै पासून ही गप्पांची भन्नाट मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT