Samantha Sakal
मनोरंजन

Samantha: कुठलाही दिखावा न करता 'हे' काम करून सामंथा साजरा करणार वाढदिवस

सामंथा 28 एप्रिल रोजी 36 वर्षांची होणार आहे. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल' या सिरीजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Aishwarya Musale

साऊथची लेडी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सामंथा रुथ प्रभूचा 36 वा वाढदिवस जवळ येत आहे. सामंथा 28 एप्रिल रोजी 36 वर्षांची होणार आहे. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल' या सिरीजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, या सगळ्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाचे प्लॅन्स उघड केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, सामंथा तिच्या वाढदिवशी 'सिटाडेल' या सिरीजच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल. म्हणजे अभिनेत्री तिच्या वाढदिवसालाही काम करणार आहे. कारण तिला देशाच्या एका लँडमार्कमध्ये शूट करायचे आहे. समांथाने चित्रपटाच्या सेटवर वाढदिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. गेल्या वर्षी तिच्या वाढदिवशी, ती काश्मीरमध्ये विजय देवरकोंडा विरुद्ध रोम-कॉम 'कुशी'वर काम करत होती.

अलीकडेच सामंथाने प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल' या इंटरनॅशनल सिरीजच्या लंडन प्रीमियरला हजेरी लावली होती. यादरम्यान, तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन, दिग्दर्शक राज आणि डीके या कार्यक्रमात होते. इंडियन सीरीज रिचर्ड मॅडेन आणि प्रियांका चोप्रा स्टारर अमेरिकन शोशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

'सिटाडेल'च्या भारतीय आवृत्तीशिवाय, सामंथाकडे शिवनिर्वाणाची 'कुशी' देखील आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. नुकताच सामंथाचा शाकुंतलम हा चित्रपट प्रदर्शित झाला. समंथा मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप आशा होत्या. या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसापासूनच खराब कामगिरी केली आणि अखेरीस तो फ्लॉप ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT