Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya esakal
मनोरंजन

समांथानं 'माहेर'ची साडी केली परत; जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

समांथा गेल्या काही दिवसांपासून 'पुष्पा' चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळं चर्चेत होती; पण..

टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेता नाग चैतन्यला (Naga Chaitanya) घटस्फोट दिल्यानंतर ती नेहमीच तिच्या भावनांबद्दल सोशल मीडियावर मोकळेपणानं व्यक्त झालीय. समंथा तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करत तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देते.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा गेल्या काही दिवसांपासून 'पुष्पा' या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती; पण त्या आधी समांथा ही तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळं चर्चेत होती. खरंतर समांथा आणि नागा चैतन्यची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत या जोडीचा चांगलाच बोलबाला होता. मात्र, अचानक समांथानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नागा चैतन्यचं आडनाव (Akkineni) काढून टाकलं. एवढचं काय तर त्या दोघांनी एक दिवस सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट झाल्याचं सांगितलं. त्यामुळं त्यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे, समांथानं तिची लग्नाची साडी (Wedding Saree) नागा चैतन्यच्या कुटुंबाला परत केलीय.

एका रिपोर्ट्सनुसार, समांथानं लग्नात नेसलेली साडी नागाच्या आजीची होती, असं म्हटलंय. समंथाला नागा किंवा त्याच्या कुटुंबाची कोणतीही गोष्ट जवळ ठेवायची नाहीय, असं समजतंय. 'इंडिया टुडे'मधील एका रिपोर्टनुसार, तिची मैत्रिण क्रेशा बजाज (Kresha Bajaj) हिनं साडीला अंतिम टच दिला होता. मात्र, समांथानं तिची लग्नाची साडी नागा चैतन्यला परत केलीय. ती साडी डग्गुबती कुटुंबातील असल्यानं समांथानं ती परत देण्याचा निर्णय घेतलाय. समंथाची साडी चित्रपट निर्माते डी रामनायडू यांच्या पत्नी आणि नागा चैतन्यची आजी डी राजेश्वरी यांनी त्यांच्या लग्नात परिधान केली होती. त्यानंतर समांथानं तिचं साडी तिच्या लग्नात परिधान केली होती.

समांथाला नागा चैतन्य किंवा त्याच्या कुटुंबाशी संबंधित कोणतीही गोष्ट स्वत: जवळ ठेवण्याची इच्छा नाही आणि म्हणून तिनं ती साडी परत केलीय, असं बोललं जातंय. समांथाला घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबानं 200 कोटी रुपयांची पोटगी देऊ केली होती. पण, समांथानं पोटगी घेण्यास नकार दिला. समांथा आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये गोव्यात लग्न केलं होतं. दरम्यान, नागा चैतन्य लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मधून (Laal Singh Chaddha) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तर समांथाचं 'द फॅमिली मॅन 2' (The Family Man 2) चित्रपटातील अभिनयाबद्दल तिचं कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT